पुणे : पुणे - सातारा महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशी म्हणून कारमध्ये बसलेल्या दोन प्रवाशांनी कार पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मदतीला धावून गेलेल्या व्यक्तीसोबत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर - पुणे प्रवासादरम्यान हा प्रकार घडला आहे. आम्हाला पुण्याला यायचे आहे असे म्हणत गाडीत बसले आणि चालक अंघोळीला गेल्याचा फायदा घेत गाडी पळवून नेली आहे.मोहन कुमार शिंगे आणि निशांत पायाळे अशी कार पळवून नेणाऱ्या दोघांची नावे आहेत. राजगड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विजय परसराम बामणे ( वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय बामणे हे कोल्हापूरवरून आपल्या पुण्यातील नातेवाइकांना भेटण्यासाठी निघाले होते. रात्रीची वेळ असल्याने ते वेळू गावच्या हद्दीत कामासाठी थांबले होते. त्याचवेळी त्याठिकाणी दोघेजण आले आणि आम्हाला पुण्याला जायचे आहे असे सांगितले. त्यावर आरोपींनी त्यांना ऑनलाईन प्रवाशी भाडे म्हणून १हजार रुपये पे केले. बुधवारी पहाटेच्या सुमारास वेळू येथील एका लॉजवर आरोपी आणि फिर्यादी आवरण्यासाठी उतरले. यावेळी फिर्यादी हे आंघोळीला गेले असता आरोपींनी फिर्यादीची कार घेऊन पोबारा केला. आरोपींची नावे लॉजमधील ओळखपत्रावरून समोर आली आहेत. या घटनेने कुणाला गाडीत लिफ्ट द्यावी की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजगड पोलिस करत आहेत.Read And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uPcRHQr
No comments:
Post a Comment