म. टा. प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिका आणि संयुक्तपणे विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करत आहेत. विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वेरुळाच्या भागातील काम रेल्वे प्रशासन करणार आहे. तर पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांची बांधणी महापालिकेकडून करण्यात येत आहेत. या रुळावर सुपरस्ट्रॅक्चर उभारण्यासाठी गर्डर विक्रोळी स्थानक परिसरात दाखल झाले असून त्याची जोडणी झाल्यावर गर्डर उभारण्यात येणार आहे. महापालिकेकडून पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व पिलरचे बांधकाम पूर्ण झाले आहे.- विक्रोळी रेल्वे फाटकात मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याने फाटक बंद करून उड्डाणपूल उभारण्याची मागणी येथील रहिवासी आणि राजकीय पक्षांनी केली होती.- २०१२ मध्ये पूल उभारणीचा प्रशासकीय श्रीगणेशा आखला गेला.- या पुलाची लांबी सुमारे ६१५ मीटर १२ मीटर रूंद आहे- ३५० मीटरचा भाग विक्रोळी पूर्व आणि २१५ मीटर पश्चिमेकडे- रेल्वेरुळांवरील ५० मीटर लांबीचे गर्डर मध्य रेल्वेकडून उभारण्यात येणार आहेत.- मध्य रेल्वे प्रशासनाने सबस्ट्रक्चरचे काम पूर्ण केले आहे.- सुपरस्ट्रॅक्चरसाठी गर्डर प्रत्यक्ष स्थळी दाखल झाले असून ३ गर्डरची जोडणी पूर्ण झाली आहे.- रिसर्च अँड डिझाइन स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) फॅब्रिकेशन पूर्ण झालेल्या गर्डरची तपासणी करण्यात आली आहे.- रेल्वे गर्डर उभारण्यासाठी पूर्वेला १००मीटर जागेची उपलब्धता करण्याचे काम सुरू आहे.- पुलाच्या जोडरस्ता उभारणीचे काम सुरू आहे.- सुपरस्ट्रक्चरसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला असून याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.- हा पूल झाल्यास पूर्व आणि पश्चिम हे अंतर फक्त दोन मिनिटांत पार होणार आहे.- सध्या पूर्वेकडून पश्चिमेला किंवा पश्चिमेकडून पूर्व भागात जाण्यासाठी कांजूरमार्ग गांधी नगरमार्गे तब्बल तीन ते चार किमीचा फेरा मारावा लागतो.- पुलासाठी १३ मे २०२३ ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mavsB7H
No comments:
Post a Comment