भारतातील सर्वाधिक दानशूर व्यक्तींची यादी एडलगिव्ह हुरून इंडिया फिलांथ्रोफी लिस्ट २०२३ ही गुरुवारी प्रसिद्ध झाली. या यादीत ११९ दात्यांचा समावेश असून त्यांनी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या वर्षभरात एकूण ८,४४५ कोटी रुपये दान केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५९ टक्क्यांनी वाढला आहे. त्यात एचसीएल या आयटी कंपनीचे शिव नाडर हे सलग दुसऱ्या वर्षी प्रथम स्थानी आहेत. त्यांनी वर्षभरात २,०४२ कोटींची रक्कम दान केली आहे. या यादीनुसार विविध सामाजिक कार्यांसाठी सर्वाधिक दान देणाऱ्या व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत. क्रमांक १शिव नाडर - सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक एचसीएल टेक्नॉलॉजीज (आयटी कंपनी)एकूण दानधर्म २,०४२ कोटी रु.दररोज ५.६ कोटींचे दानगतवर्षीच्या तुलनेत ७६टक्के वाढकला, संस्कृती, वारसा या क्षेत्रासाठी दानचौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत भारतीयएकूण संपत्ती २.२८ लाख कोटी क्रमांक २ अझीम प्रेमजी विप्रो (आयटी कंपनी)एकूण दानधर्म १,७७४कोटी रु.गतवर्षीच्या तुलनेत २६७ टक्के वाढशिक्षण क्षेत्रासाठी प्रामुख्याने दानभारतातील श्रीमंतांच्या यादीत ५८ वे स्थानएकूण संपत्ती ३० हजार कोटी क्रमांक ३ मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजएकूण दानधर्म ३७६ कोटी रु.गतवर्षीच्या तुलनेत ८ टक्के घटआरोग्यासाठी दानधर्मभारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एकूण संपत्ती ८.०८ लाख कोटी (वर्षभरात दोन टक्क्यांनी वाढ) क्रमांक ४कुमार मंगलम बिर्ला आदित्य बिर्ला ग्रुपएकूण दानधर्म २८७ कोटी रु.गतवर्षीच्या तुलनेत १८ टक्के वाढ क्रमांक ५गौतम अदानी अदानी उद्योगसमूहएकूण दानधर्म २८५ कोटी रु.गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्के वाढगतवर्षीच्या तुलनेत दानशूरपणात अदानींचा क्रमांक दोन आकड्यांनी वर सरकला.दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत भारतीयएकूण संपत्ती ४.७४ लाख कोटी सर्वात तरुण दाताझिरोधा या डिस्काउंट ब्रोकरेज फर्मचे निखिल कामत (३७ वर्षे) हे ठरले सर्वात तरुण दाताकामत बंधूंनी दिलेल्या एकूण देणग्या ११० कोटी देणाऱ्याचे हात घ्यावे...संपत्तीत वाढ होत असताना, देणग्या देण्याकडे भर दिसत आहे. अन्न, वस्त्र, शिष्यवृत्ती यांसाठी देणग्या देण्यापासून ते नवीन क्षेत्रांपर्यंत या दानशूरांचे लक्ष जात आहे. या देणगीदारांच्या प्रयत्नांची दखल घेणे तसेच त्यांचा प्रभाव समाजाचा सर्व स्तरांपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे या दानशूरांची यादी प्रसिद्ध करम्यामागील हेतू आहे, असे हुरून इंडियाचे प्रमुख संशोधक आणि व्यवस्थापकीय संचालक अनस रहमान जुनैद यांनी सांगितले.संकलन- सोनिया नारकर
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IX7SxLw
No comments:
Post a Comment