म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३५ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. पहाटेच्या वेळी वातावरणात आर्द्रता असली, तरी दिवसभर ही आर्द्रता राहत नाही. मुंबईवर दिसणारी धुरक्याची चादर मात्र सातत्याने टिकून आहे. तापलेल्या उन्हाचे प्रमाण वाढले असले, तरी हवा हलकी होऊन प्रदूषके वाहून नेली जात आहेत का, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. दुपारच्या वेळीही धुरके दिसत आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये स्थानिक पातळीवर प्रदूषणाचीही चर्चा होत असल्याने मुंबईतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचा केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्रालयाच्या ‘सफर’ या प्रणालीच्या तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या केंद्रांवर नोंदल्या जाणाऱ्या निर्देशांकांच्या आधारे घेतलेला हा आढावा...सफरचे निर्देशांक -मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक- १२५कुलाबा- २२१ (पीएम २.५)माझगाव- १५६ (पीएम २.५)वरळी- १०५ (ओझोन)चेंबूर- ११६ (ओझोन)वांद्रे-कुर्ला संकुल- १८० (पीएम २.५)अंधेरी- ८२ (पीएम १०)भांडुप- १०७ (पीएम १०)मालाड- १५७ (पीएम २.५)बोरिवली- १२७ (पीएम २.५)महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देशांककुलाबा- २३६ (पीएम २.५)वरळी- १९० (पीएम २.५)सायन- २२२ (पीएम २.५)कुर्ला- १४३ (पीएम १०)वांद्रे-कुर्ला संकुल- १६६ (पीएम १०)खेरवाडी वांद्रे पूर्व - २०१ (पीएम २.५)पवई- १८२ (पीएम २.५)मुंबई विमानतळ-१६७ (पीएम १०)विलेपार्ले-१६० (पीएम २.५)कांदिवली १७५ (पीएम २.५)बोरिवली १०४ (पीएम १०)वाईट गुणवत्तासफरच्या नोंदीनुसार गुरुवारी सकाळी वरळी येथे २५४, वांद्रे-कुर्ला संकुल येथे २०१, कुलाबा येथे २०३ अशा निर्देशांकांची नोंद झाली. हे निर्देशांक हवेची वाईट गुणवत्ता नोंदवत होते. त्यानंतर दुपारनंतर हवेची दिशा बदलल्यावर गुरुवारी संध्याकाळी केवळ कुलाबा येथे हवेची गुणवत्ता वाईट होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारीही कुलाबा येथे वाईट हवेचीच नोंद दाखवत होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांकानुसार शीव, तसेच वांद्रे पूर्वच्या खेरवाडी येथेही हवेची गुणवत्ता वाईट होती. इतर केंद्रांवर बहुतांश ठिकाणी सफर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती. या नोंदींमध्ये मोठा फरक आढळून आला नाही.सध्या मुंबईच्या हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची असून दुपारपर्यंत पूर्वेकडून येणारे वारे अत्यंत संथ गतीने वाहत आहेत. समुद्रावरून येणारे वारे उशिरा वाहत आहेत. त्यामुळे हवेमध्ये प्रदूषके दीर्घ काळ साचून राहत आहेत. परिणामी धुरक्याचे अस्तित्व दिसते. ही हवा दुपारी समुद्रावरून वारे वाहायला लागले की स्वच्छ होते. त्यानंतर रात्री पुन्हा पूर्वेकडून वारे वाहायला लागतात. तेव्हा प्रदूषके वाहून नेली जात नाहीत. पुढील दोन ते तीन दिवस तरी हवा मध्यम स्वरूपाची असेल, असा अंदाज आहे - सुनील कांबळे, प्रादेशिक हवामान विभाग अधिकारीधुरके का दिसते?जमिनीलगतच्या थरांमध्ये थंड हवा असेल आणि वरच्या थरात गरम हवा असेल, तर हवेचे संक्रमण होत नाही. त्यामुळे प्रदूषके खालच्या थरात अडकून पडतात. त्यामुळे धुरके दिसते. साधारण जमिनीजवळच्या थरात हवा गरम असते. जमिनीपासून उंच गेल्यावर हवा थंड आणि विरळ होते. तेव्हा प्रदूषके वाहून नेली जातात. प्रदूषके साचून राहण्यासाठी खालच्या थरातील थंड हवा हेही एक कारण असू शकते. ६ नोव्हेंबरपर्यंत मुंबईमध्ये धुरक्याचे सावट कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पश्चिमी प्रकोप निर्माण होण्याचा अंदाज आहे. यामुळे वाऱ्यांची दिशा कदाचित बदलू शकते. तेव्हा वाऱ्याचा वेग वाढून प्रदूषके वाहून नेली जाऊ शकतात.Read And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lIafYxV
No comments:
Post a Comment