रत्नागिरी: अलीकडे मागचा पुढचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलण्याचे दुर्दैवी प्रकार अनेकदा घडत आहेत. यामध्ये युवापिढीचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही सारी परिस्थिती चिंताजनक आहे. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात घडला आहे. कॉलेजला जायला कंटाळा येतो म्हणून विषारी औषध प्राशन करत युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर हॉस्पिटलमध्ये त्याची गेले काही दिवस सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. रत्नागिरी तालुक्यातील अमर दीपक घाणेकर (१८), रा. देवूड पिंपळवाडी असे या युवकाचे नाव आहे. अमर हा इयत्ता अकरावी शिकत असलेला जाकादेवी हायस्कूलचा विद्यार्थी होता. या युवकाने गेल्या महिन्यात २१ ऑक्टोबर रोजी रागाच्या भरात गवत मारण्याचे विषारी औषध पाण्यात टाकून प्राशन केले होते. यानंतर त्याला रत्नागिरी येथील एका खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तात्काळ त्याला मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथून त्याला ९ नोव्हेंबरच्या दरम्यान त्याला मुंबई येथून रत्नागिरी येथील एकदा खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याला पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारकरता दाखल करण्यात आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे १७ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी चारच्या दरम्यान त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. कॉलेजला जाण्यास कंटाळा आला म्हणून त्याने रागाचे भरात त्याचे गवत मारण्याचे वापरलले टिलक्वेंट विषारी औषध गुरांच्या गोठ्यात ठेवलेले होते. हे औषध घरात कोणीही नसताना त्याने स्वत: त्यामधील थोडे पाण्यात टाकून प्यायल्याने त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. वैद्यकीय उपचारांची शर्थ केल्यानंतरही त्याला यश आलं नाही. त्याच्या आईवडिलांची परिस्थिती बेताची असून त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यापेक्षा आई-वडील एक लहान भाऊ असा परिवार आहे. रत्नागिरी तालुक्यात देऊड गावात त्याच्यावर शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या सगळ्या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PNjKT0t
No comments:
Post a Comment