म. टा. प्रतिनिधी, नाशिक :आठ दिवसांपूर्वी सोलापूर औद्योगिक वसाहतीत धाड टाकून एमडी (मॅफेड्रॉन) तयार करणाऱ्य कारखान्यावर धाड टाकल्यानंतर आता नाशिक पोलिसांनी पुन्हा त्याच भागात दुसऱ्यांदा छापा टाकला. शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी उशिराने सोलापुरातील ‘नशेचे गोदाम’ उद्ध्वस्त करण्यात आले.या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल हस्तगत केल्याची माहिती पोलिस आयुक्तालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता.सामनगाव एमडी प्रकरणातील संशयित सनी पगारे याने सोलापूरमध्ये सुरू केलेला ‘एमडी’चा कारखाना नाशिक अमली पदार्थविरोधी पथक (एनडीपीएस) आणि गुन्हे शोध युनिट एकच्या पथकाने २७ ऑक्टोबर रोजी उद्ध्वस्त केला. तेथून दहा कोटी रुपयांच्या ‘एमडी’सह कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात नाशिकचा मनोहर काळे या संशयिताला पोलिसांनी दि. २८ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याने सनीच्या सांगण्यावरून वीस हजार रुपये दरमहा नफ्याकरिता कारखान्याचा कायदेशीर करार केला होत. काळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २) वैद्यनाथ वावळ याला अटक करण्यात आली. वावळने दिलेल्या माहितीनुसार कारखान्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल एका गोदामात होता. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेची संयुक्त पथके सोलापुरात दाखल झाली. त्यांनी शुक्रवारी (दि. ३) सोलापुरातल्या गोदामात धाड टाकून कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत केला. आज, शनिवारी (दि. ४) आयुक्तालयातर्फे या कारवाईसंदर्भातील विस्तृत माहिती स्पष्ट होणार आहे.‘फॉर्म्युला’ नेमका कोणाचा?आठ दिवसांपूर्वी सोलापूरमधील ‘एमआयडीसी’त एमडी तयार होणारा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर नाशिक पोलिसांनी वैद्यनाथ ऊर्फ दयानंद वावळ (रा. सोलापूर) याला अटक केली. त्याला एमडीचा ‘फॉर्म्युला’ कोणी व कधी शिकविला यासाठीच्या तपासाकरिता पथकांनी पुन्हा सूत्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी वैद्यनाथची कसून चौकशी सुरू आहे. सनी याला मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज तयार करायचे होता. त्यासाठी त्याने ‘फॅक्टरीचा सेटअप’ तयार केला होता. कारखान्यानंतर गोदाम उद्ध्वस्त झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. दरम्यान, संशयित अक्षय नाईकवाडे अद्यापही फरार आहे....या टोळीला ‘मोक्का’पुणे पोलिसांनी ललित पानपाटीलच्या टोळीला ‘एमडी’प्रकरणात ‘मोक्का’ लावला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनीही नशेच्या साखळीत काम करणाऱ्यांची धरपकड करून पुढील कारवाईची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत सामनगाव ‘एमडी’प्रकरणात दहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी, सनी व सुमित हे पगारेबंधू, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे, मनोहर काळे आणि वैद्यनाथ वावळ यांचा समावेश आहे. वडाळागाव प्रकरणात वसीम रफिक शेख, नसरीन ऊर्फ छोटी भाभी, इम्तियाज शेख, सलमान अहमद फलके आणि शब्बीर ऊर्फ आयना अब्दुल अजिज मेमन यांना अटक केली. या पंधरा संशयितांना लवकरच ‘मोक्का’ लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाने दिली.-नाशिक पोलिसांचा आठ दिवसांत दुसरा छापा-सामनगाव ‘एमडी’प्रकरणात कारवाई-रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा-कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल हस्तगत-सामनगाव ‘एमडी’प्रकरणात आतापर्यंत दहा संशयितांना अटक-पंधरा संशयितांना ‘मोक्का’ लावण्याची चिन्हे
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/StfVKQD
No comments:
Post a Comment