Breaking

Saturday, November 4, 2023

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील घटनेनं हळहळ https://ift.tt/pgdFyji

पुणे: पुरंदर तालुक्यातील सासवडजवळ असणाऱ्या परिंचे-सासवड रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहने काही अंतरावर उडून पडली आहे. यात अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. संजय जयसिंग नानगुडे (२६) आणि चंद्रकांत संपत दानवले (५०) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अचानक झालेल्या अपघाताने रस्त्यावर काही वेळ गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृत दानवले हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकी क्र. एम एच १२ जे पी ९४८९ या दुचाकीवरून परिंचे गावाकडून सटलवाडीकडे निघाले होते. तर संजय नानगुडे हे त्यांची दुचाकी क्र. एम एच १२ इ एक्स ०५३२ वरून येत असताना परींचे - सासवड रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. ही दोन्ही वाहने वेगात असल्याची माहिती समोर आहे. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा अधिक तपास सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल खोमणे पुढील तपास करीत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RS2CwaL

No comments:

Post a Comment