Breaking

Thursday, December 21, 2023

भाजपचं मिशन बारामती, नवनाथ पडळकरांवर मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळेंनी लोकसभेसाठी डाव टाकला https://ift.tt/9rh341m

पुणे : यांच्या रूपाने दिला बारामती लोकसभेसाठी भाजपनं ओबीसी चेहरा प्रभारीपदी निवडला आहे. बारामती लोकसभेसाठी भाजपने आपली नवी रणनीती आखली आहे. भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा प्रभारी म्हणून नवनाथ पडळकर यांच्या नावाची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटलेला आहे. त्यातच बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर येथे झालेला ओबीसी एल्गार महामेळावा राज्यभर गाजला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नवनाथ पडळकर यांच्या रूपाने ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. या खेळीतून भाजपने शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात हात घातला असून यांना घेण्याची रणनीती आखली असल्याचे जाणवते. बारामती लोकसभा मदारसंघ हा ओबीसी बहुल आहे. त्यातही धनगर समाजाचे मतदान येथे लक्षणीय आहे. विशेष म्हणजे इंजिनियर व उच्चविद्याविभूषित असणारे नवनाथ पडळकर हे २०१९ च्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यांच्या पाठीशी बारामती लोकसभेच्या अनुभवाची शिदोरी आहे. नुकताच त्यांनी ओबीसी, वंचित, भटक्या विमुक्त समाजाच्या विविध नेत्यांसोबत भाजपमध्ये ताकदीने प्रवेश केला होता. सध्या ते भाजपचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे पडळकर यांची प्रभारी पदी नियुक्ती करुन भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा जिंकण्यासाठी कंबर कसल्याचेच दिसून येते. मुळातच या मतदारसंघात २०१४ आणि १०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस च्या सुप्रिया सुळे यांना झुंजवले होते. भाजपच्या कमळावर येथे आजवर पाच लाखाहून अधिक मतदार झालेले आहे. त्यात अजित पवारांचा राष्ट्रवादीचा एक मोठा गट सोबत आला आहे. शिवाय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना व मतदारसंघात सार्वजनिक कामांचा लावलेला तडाका पाहता जिंकण्यासाठी लागणारे मार्जिन मतदान आम्ही सहजपणे मिळवुन मोठ्या फरकाने बारामती लोकसभा जिंकू अशा प्रकारची भूमिका नवनाथ पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.Read Latest And


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tVvmXPD

No comments:

Post a Comment