Breaking

Sunday, December 31, 2023

दुर्दैवी! थर्टी फस्टची पार्टी जीवावर बेतली; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश https://ift.tt/k8MVaY4

पुणे: सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या उत्सवाला गालबोट लावणारी घटना मावळ तालुक्यातून समोर आली आहे. नव वर्षांच्या स्वागतासाठी अनेकजण नदी काठी, धरणाकाठी फिरायला जातात. मात्र थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर भाटी (३०, रा. शिक्षक सोसायटी वराळे) असे नदीत बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदी पात्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. मयूर हा मित्रांसोबत मावळ तालुक्यातील वराळे येथे थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी वराळे येथील इंद्रायणी नदी काठी आले होते. पोहण्यासाठी मयूर पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह काढण्यासाठी वन्य जीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्यांनी काही वेळात मृतदेह बाहेर काढला आहे. नव वर्षांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. मयूर यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे फिरायला जाताना किंवा पार्टी करण्यासाठी जाताना नदीकाठी जाणे टाळावे, गेल्यास पाण्यात उतरणे टाळावे, नाही तर आपला जीव गमावावा लागू शकतो. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/z4R6P2V

No comments:

Post a Comment