Breaking

Saturday, December 30, 2023

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करा, निमंत्रितांशिवाय अयोध्येत येऊ नका, मोदींची रामभक्तांना विनंती https://ift.tt/MQ4d8xr

वृत्तसंस्था, अयोध्या: विकास आणि वारसा यांच्या एकत्रित ताकदीच्या बळावर भारत २१व्या शतकामध्ये अग्रेसर होईल, असा विश्वास यांनी शनिवारी अयोध्येमध्ये व्यक्त केला. 'अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जगभरात उत्कंठा आहे. २२ जानेवारी हा प्राणप्रतिष्ठेचा दिवस संपूर्ण देशात दिवाळी म्हणून साजरा व्हावा आणि श्रीराम ज्योती आपल्या घरी प्रज्वलित करावी', असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले. त्याचबरोबर २२ जानेवारीला निमंत्रितांशिवाय कुणीही अयोध्येत येऊ नये, अशी हात जोडून विनंती करतो, असे ते म्हणाले.'मी १४० कोटी देशवासीयांना हात जोडून प्रार्थना करतो, २२ जानेवारीला प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये विराजमान होत आहेत. हा आनंद साजरा करण्यासाठी घरोघरी श्रीराम ज्योती प्रज्वलित करावी आणि दिवाळी साजरी करावी. २२ जानेवारीची संध्याकाळ संपूर्ण भारतभर उजळून निघावी, प्रकाशमान व्हावी', असे ते म्हणाले. एक काळ असा होता, जेव्हा रामलल्ला अयोध्येत तंबूमध्ये राहत होते. आज फक्त रामलल्लालाच पक्के घरे मिळाले आहे, असे नव्हे; तर, देशातील चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी पक्के घर मिळाले आहे', अशी पुस्ती त्यांनी जोडली.विमानतळ, रेल्वे स्थानकाचे उद्घाटनअयोध्या : अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी येथे दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी विमानतळ आणि विकसित अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विमानतळ ते रेल्वे स्थानक मार्गावर पंतप्रधानांचा रोड शो प्रचंड उत्साहामध्ये पार पडला.रामलल्लाच्या सावळ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा?नवी दिल्ली : अयोध्येमध्ये २२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यावेळी मुख्य गाभाऱ्यामध्ये श्यामवर्णी म्हणजे सावळ्या कांतीच्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. अंतिम निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या पांढऱ्या व निळसर रंगाच्या अन्य दोन राममूर्ती मंदिर परिसर संकुलातच उभारण्यात येणार आहेत. या तीनही मूर्तींची उंची प्रत्येकी ५१ इंच असून, त्या आठ फूट उंचीच्या पायावर स्थापित केल्या जाणार आहेत.विकास आणि वारसा यांचे जतन व संवर्धन यांची एकत्रित शक्ती भारताला २१व्या शतकात प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल.-पंतप्रधान नरेंद्र मोदीRead And


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CRmA8oa

No comments:

Post a Comment