Breaking

Friday, December 29, 2023

आसामचे शांततेच्या दिशेने पाऊल; उल्फा या सशस्त्र अतिरेकी संघटनेसोबत त्रिपक्षीय शांतता करार https://ift.tt/oXz2N7c

नवी दिल्ली: आसाममध्ये ४० वर्षांत प्रथमच शांततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. अतिरेकी संघटना उल्फासोबत केंद्र आणि आसाम सरकारने शांतता करारावर शुक्रवारी स्वाक्षऱ्या केल्या. दिल्लीमध्ये शुक्रवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या करारामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसक कारवायांना चाप लागण्याची शक्यता आहे., ( ) आणि यांच्यात त्रिपक्षीय करारावर शुक्रवारी स्वाक्षऱ्या झाल्या. गेल्या ४० वर्षांत अशा प्रकारचा करार प्रथमच होत आहे. गेली अनेक वर्षे सुरक्षा दलांसोबत सशस्त्र संघर्ष करणाऱ्या उल्फाच्या कारवायांना या करारामुळे आळा बसेल.दिल्लीत झालेल्या या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, गृह सचिव अजय भल्ला, आसामचे पोलिस महासंचालक जी. पी. सिंह यांच्यासह उल्फाचे सदस्य उपस्थित होते. परेश बरूआ यांच्या नेतृत्वाखालील उल्फाचा गट मात्र या करारात सहभागी झालेला नाही.आसामच्या लोकांसाठी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे यावेळी अमित शहा म्हणाले. ‘आसाम दीर्घकाळ हिंसाचाराने ग्रस्त राहिले. १९७९ ते आत्तापर्यंत १० हजार लोकांनी या हिंसाचारात प्राण गमावले,’ असे ते म्हणाले. ‘आसामचा सगळ्यांत जुना अतिरेकी गट उल्फा, हिंसा सोडून लोकशाही प्रक्रियेत सामील होत आहे. या करारानुसार आसामला एक विकास पकेज दिले जाईल. आता आसाममध्ये हिंसेच्या घटना ८७ टक्के, मृत्यूच्या घटना ९० टक्के तर अपहरणाच्या घटना ८४ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत,’ असे शहा म्हणाले. मुख्यमंत्री शर्मा यांनीही या कराराला ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे. १२ वर्षे सातत्याने चर्चा अरविंद राजखोवा यांच्या गटासोबत सरकारची तब्बल १२ वर्षे चर्चा सुरू होती. त्याचे हा करार फलित आहे. उल्फासोबत झालेल्या करारातील मुख्य मुद्दे१ आसामच्या लोकांचा सांस्कृतिक वारसा अबाधीत राहील२. आसामच्या नागरिकांसाठी रोजगाराच्या अनेक योजना आणण्यात येतील३ उल्फाच्या सदस्यांना योग्य रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल ४. सशस्त्र कारवायांत सहभागी असलेल्या, मात्र तो मार्ग सोडलेल्या उल्फाच्या सदस्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. उल्फाच्या कारवाया १९७९ पासूनउल्फाची स्थापना १९७९ मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून ही संघटना हिंसक कारवायांमध्ये सहभागी आहे. १९९० मध्ये या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OiYDBvA

No comments:

Post a Comment