काठमांडू: नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार याच्या अडचणी वाढल्या आहेत. संदीपला कोर्टाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. नेपाळमधील न्यायालयाने जानेवारी महिन्यात लामिचानेला जामीन दिला होता. गेल्या ऑगस्टमध्ये काठमांडू येथील एका हॉटेल रुममध्ये १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. २३ वर्षीय लामिचाने आयपीएल खेळणारा पहिला नेपाळी क्रिकेटपटू होता. त्याने २०१८ साली दिल्ली कॅपिटल्सकडून पदार्पण केले होते. काठमांडू पोस्टच्या रिपोर्टनुसार न्यायमूर्ती शिशिर राज ढकाल यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने शुक्रवारी त्याला दोषी ठरवले. लामिचानेवरील आरोपांची सुनावणी रविवारी सुरू झाली होती. काठमांडू जिल्हा न्यायालयाने लामिचानेला बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवले. या प्रकरणी पुढील सुनावणीत लामिचानेला शिक्षा सुनावली जाईल. सध्या लामिचाने जामीनावर बाहेर आहे. १२ जानेवारी रोजी पाटन उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. न्यायाधीश ध्रुवा राज नंदा आणि रमेश दहल यांच्या संयुक्त खंडपीठाने अटी आणि २० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. लामिचाने हा लेग स्पिनर आणि गुगली गोलंदाज होता. त्याच्या गोलंदाजीमुळे जगभरातील टी-२० लीगमध्ये तो लोकप्रिय देखील होता. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये तो खेळायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ५० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या, तर टी-२० मध्ये सर्वात वेगाने ५० विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तो तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने या वर्षी ऑगस्ट महिन्यात केनियाविरुद्ध अखेरची टी-२० मॅच खेळली होती. काठमांडू जिल्हा न्यायालयाने चार नोव्हेंबर २०२२ रोजी लामिचानेला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर सहा ऑक्टोबर रोजी त्याला त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PEFgHAY
No comments:
Post a Comment