Breaking

Saturday, December 2, 2023

चार राज्यांत आज मतमोजणी, निकालाबाबत देशभरात उत्सुकता, राजकीय पक्षांची धाकधूक वाढली https://ift.tt/qcUDM0F

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकींची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतील छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण या चार राज्यांत आज, रविवारी मतमोजणी होणार आहे. मिझोराममध्ये उद्या, सोमवारी मतमोजणी केली जाणार आहे.राज्यांतील लढतींचे चित्र- राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे.- मध्य प्रदेशात , तर तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्त्वातील सत्तेत आहे.- छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे.- तेलंगणमध्ये भारत राष्ट्र समिती प्रमुख स्पर्धक असून, सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी के. चंद्रशेखर राव प्रयत्नशील आहेत. कोठे किती जागा?राजस्थान १९९मध्य प्रदेश २३०छत्तीसगड ९०तेलंगण ११९निकालाबाबत उत्सुकतामतदानानंतरच्या कलचाचण्यांमध्येही एकसूर नसल्याने निकालाबाबत अधिकच उत्सुकता आहे. मध्य प्रदेशात एकूण २३०, छत्तीसगडमध्ये ९०, तेलंगणमध्ये ११९, तर राजस्थानात १९९ जागांसाठी मतदान पार पडले आहे. मतमोजणी केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HIxcNTl

No comments:

Post a Comment