बीड : भाजप नेत्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करुन कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. आगामी १२ डिसेंबर रोजी गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी कार्यकर्त्यांनी गोपिनाथ गडावर मोठ्या संख्येनं जमण्यापेक्षा गोपिनाथ गड गावोगावी नेण्यासाठी प्रयत्न करुया, असं आवाहन त्यांनी केलं आहे. गोपिनाथ मुंडे यांचे विचार तरुणांना समजण्यासाठी गावोगावी जयंती साजरी करावी, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे काय म्हणाल्या?नमस्कार मी पंकजा गोपिनाथ मुंडे आज आपल्याशी हितगूज करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. माझा विषय तुम्हाला कळलाच असेल, १२ डिसेंबर जवळ येत आहे. एका आपल्या अत्यंत आवडत्या व्यक्तीच्या वाढदिवसाला जयंती म्हणावं लागत आहे. हे दु: ख आपण सर्वांनी पचवलेलं आहे. मुंडे साहेबांचं असणं जेवढं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं तेवढं त्यांचं नसणं आपल्यासाठी दु:खाचं होतं. ते दु:ख पचवून, आठवण ठेवून गेली १० वर्ष आपण त्यांची आठवण ठेवून काम करतोय. मी गोपिनाथ गडाची जेव्हा निर्मिती केली, त्या गोपिनाथ गडाची महती गावोगावी जाणार आहे हा मला विश्वास होता, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपण पाहात आहात, कोणत्याही पक्षाचे, कोणत्याही विचाराचे नेते गोपिनाथ गडावर जातात आणि मुंडे साहेबांना नतमस्तक होतात. गोपिनाथ गड जेव्हा निर्माण केला तेव्हापासून ३ जून आणि १२ डिसेंबरला फार मोठ्या संख्येनं आपण मनात वेदना एकत्र ठेवून एकत्र येत आहोत. आपण विविध समाजोपयोगी कार्यक्रम त्यानिमित्तानं घेतो, महाआरोग्य शिबीर घेतलं, दिव्यांगाना साहित्य वितरित करण्याचा कार्यक्रम घेतला. पण, मागच्या वर्षापासून १२ डिसेंबरला गोपिनाथ गडावर गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती साजरी न करता गोपिनाथगड गावोगावी नेला पाहिजे, असा विचार केला आहे, असं पकंजा मुंडे म्हणाल्या.मुंडे साहेबांची जयंती गावोगावी साजरी झाली पाहिजे. तरुण पिढीला ज्यांनी मुंडे साहेबांबद्दल ऐकलं आहे पण पाहिलं नाही, त्यांना मुंडे साहेब काय होते हे त्यामाध्यमातून कळेल. त्यातून ते प्रेरणा घेतील आणि त्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण होईल. ऊर्जा, आशा आणि प्रेरणा हा गोपिनाथ गडाचा पाया आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जे दर्शनाला गोपिनाथगडावर जे येतीलचं त्यांचं स्वागत आहे पण मी आपणाला विनंती करते की, आपण जिथं आहेत, शहरात, गावात, वाडी आणि वस्तीवर जिथं असाल तिथं गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती साजरी करावी, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडे साहेबांचा विचार कायम ठेवण्याचा प्रण आपला आहे त्यासाठी आपली एकजूट कायम ठेऊया. गोपिनाथ गड गावोगावी जावा, मुंडे साहेबांचे विचार गावोगावी न्या, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. Read Latest And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DOmtKyG
No comments:
Post a Comment