म. टा. प्रतिनिधी, पुणे : मतदार नोंदणीसाठी आता अवघे तीन दिवस राहिले असून गेल्या महिनाभरात सुमारे १४ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये नवमतदारांचे सर्वाधिक सव्वासात लाख अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहेत. नवमतदारांचे सर्वांत जास्त अर्ज नागपूरमधून तर त्यानंतर पुणे जिल्ह्यातून आले आहेत. लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पाच जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. या मतदार यादीनुसार, मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्याकरिता येत्या नऊ डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणी, मयतांची नावे वगळणे किंवा पत्ता बदलणे यासारख्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. राज्य निवडणूक विभागाकडे २७ ऑक्टोबर ते आतापर्यंत सुमारे १३ लाख ८१ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये नव्याने मतदार नोंदणी यासह मयतांची अथवा दुबार नावे वगळणे, तसेच मतदान कार्डात बदल, पत्ता बदल करणे अशा अर्जांचा समावेश आहे.
सव्वासात लाख नवमतदार
राज्यात एका महिन्यात दाखल झालेल्या एकूण अर्जांमध्ये नवमतदारांचे अर्ज अधिक आहेत. सुमारे सात लाख २६ हजार ८३३ एवढे नवमतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी तीन लाख २३ हजार ६७५ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तसेच १३ हजार ४०१ अर्ज फेटाळले आहेत. उर्वरीत तीन लाख ८९ हजार ७५७ अर्जाबाबत अद्याप कार्यवाही सुरू आहे. नवमतदारांमध्ये सर्वाधिक अर्ज नागपूरमधून ५७ हजार ९१६ आले असून त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातून ५७ हजार ५९३ इतके अर्ज आले आहेत. सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चार हजार २३७ इतके आले आहेत.नाव वगळण्यासाठी चार लाख अर्ज
- एकूण १४ लाख अर्जांपैकी दुबार, मयतांची नावे वगळण्यासाठी सुमारे चार लाख ८३९ अर्ज दाखल झाले आहेत. - त्यातील एक लाख ११ हजार ६५८ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. - त्यापैकी सहा हजार ७३० अर्ज बाद करण्यात आले आहेत. - दोन लाख ८२ हजार ४४२ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. - सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक नावे वगळण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. ४८ हजार ३१५ इतके अर्ज सोलापूरमधून आले आहेत. - राज्यात दोन लाख ५३ हजार ९६९ जणांनी पत्ता बदल, फोटो बदल तसेच मतदान केंद्र बदलासाठी अर्ज केले आहेत. त्यातील पाच हजार ५६१ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.Read Latest Andfrom Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zPtcv3b
No comments:
Post a Comment