Breaking

Tuesday, January 30, 2024

रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची डोकेदुखी वाढली, दुसऱ्या कसोटीपूर्वी काय घडलं जाणून घ्या... https://ift.tt/AbZJeDX

संजय घारपुरे : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आता रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची डोकेदुखी चांगलीच वाढलेली आहे. पहिल्या कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला. पण आता दुसऱ्या सामन्यापूर्वी एका गोष्टीमुळे भारतीय संघापुढे मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. रवींद्र जाडेजा आणि लोकेश राहुल जायबंदी झाल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघनिवडीची डोकेदुखी वाढली आहे. दोघांनीही पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगली कामगिरी केली होती. दोघांच्या अनुपस्थितीत कोणाला संधी द्यावी, हा पेच भारतीय संघ व्यवस्थापनासमोर असेल.पहिल्या कसोटीत इंग्लंडने विशेषतः ओली पोपने संघाचे 'बॅझबॉल' धोरण यशस्वीपणे अमलात आणले. पहिल्या तीन दिवस वर्चस्व राखूनही पहिल्या कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला. आता पाच सामन्यांच्या मालिकेत भारतासमोर बरोबरी साधण्याचे आव्हान असेल. या परिस्थितीत प्रतिहल्ला करण्यासाठी अंतिम भारतीय संघात कोण हवे, हा प्रश्न सतावत आहे. त्यातच विराट कोहली नसल्यामुळे इंग्लंडवर दडपण आणू शकेल, असा रोहित शर्मा व्यतिरिक्त भारतीय संघात एकही फलंदाज नाही, असे मानले जात आहे. विराट कोहली जायबंदी झाल्यावर निवड समितीने रजत पाटीदारला पहिल्या कसोटीसाठी संघात घेतले होते; पण तो राखीवच होता. या परिस्थितीत राहुलऐवजी त्यालाच संधी अपेक्षित होती. मात्र, निवड समितीने सर्फराझ खानचा पर्यायही दिला आहे. त्यामुळे जास्त आक्रमक सर्फराझला संधी देण्याचाही पर्याय खुला आहे.कुलदीपचा पर्यायजायबंदी जडेजाऐवजी कुलदीप यादव संघात येणार हे स्पष्टच आहे. मात्र, संघव्यवस्थापन चार फिरकी गोलंदाजांना खेळवण्याचा विचार करीत असल्याचेही संकेत मिळत आहेत. याचबरोबर तीन फिरकी आणि एका वेगवान गोलंदाजास खेळवून एक अतिरिक्त फलंदाजांच्या निवडीचा पर्यायही खुला आहे. चार फिरकी गोलंदाजांची निवड केल्याचे ठरवल्यास वॉशिंग्टन सुंदर जास्त अनुभवी आहे; पण सौरभकुमार हा जडेजाप्रमाणेच डावखुरा फिरकी गोलंदाज; तसेच प्रथम श्रेणी लढतीत शतक केलेला फलंदाज आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात नेमकी कोणााला संधी द्यायची, हा मोठा प्रश्न रोहित आणि द्रविड यांना सुरुवातीला सोडवावा लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या सामन्यात किती फिरकीपटूंसह मैदानात उतरायचे, याचा निर्णय रोहित आणि द्रविड यांना प्रथम घ्यावा लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी भारताचा संघ निवडताना रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची चांगलीच कसोटी लागणार असल्याचे आता समोर येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bcorfEd

No comments:

Post a Comment