प्रियांका पाटीलअहमदनगर: जामखेड शहरात शासनाच्या वतीने सार्वजनिक अरोग्य विभागाच्या मार्फत मोठा खर्च करून हिंदुद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्याने सध्या तरी हा दवाखाना सलाईनवर आहे. परिणामी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आपला दवाखाना ही संकल्पना अंमलात आली. त्याठिकाणी प्राथमिक मोफत उपचार मिळत असल्याने त्याचा लाभ रुग्णांना मिळू लागला. परंतु या दवाखान्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी रुग्ण करत आहेत. कारण हा दवाखाना दुपारी दोन वाजता सुरू होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना त्याची सेवा मिळत नाही, असाच प्रकार आज सकाळी पहावयास मिळाला. जामखेड शहरातील एका दिव्यांग बांधवाला उपचारासाठी प्रहारचे तालुका अध्यक्ष नय्युमभाई शेख हे आपला दवाखाना या ठिकाणी घेऊन गेले असता त्याठिकाणी कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हते. दुरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने दिव्यांग बांधव शेख यांनी ठिकाणी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. एक तर दिव्यांगांना उपचार घेण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. कसंबसं कोणाच्यातरी मदतीने याठिकाणी गेले तर उपचारासाठी डॉक्टर नाही. त्यामुळे यावर मार्ग काढावा. यावेळी बोलताना शेख म्हणाले की. शासनाने आपला दवाखाना म्हणून गाजावाजा करत फक्त बोर्ड लावले. जाहिरातीसाठी मोठा खर्च केला. परंतु प्रत्यक्षात येथे कसलीही सुविधा सद्या स्थितीत मिळत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष्य घालून ताबडतोब रुग्णसेवा सुरळीत करावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/WZKIFbh
No comments:
Post a Comment