Breaking

Monday, January 22, 2024

राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करणार, १५० प्रश्न तयार, नेमकं काय विचारणार? https://ift.tt/n5KfiU3

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यामध्ये मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक मागासलेपण तपासण्याच्या उद्देशाने राज्य मागासवर्ग आयोगाने १५४ प्रश्नांची जंत्री तयार केली आहे. त्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकडून माहिती घेण्यात येणार आहे. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न, महिलांची स्थिती, वैद्यकीय उपचार घेण्याची साधने, पाण्याचे स्रोत, त्याची उपलब्धता, समाजातील अंधश्रद्धा, बालमृत्यू, कुपोषण, विधवांचे सामाजिक स्थान अशा विविध प्रकारच्या प्रश्नांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.व्यक्तिगत माहितीमूलभूत माहितीमध्ये संबधित व्यक्तीची संपूर्ण माहिती, ती व्यक्ती कोणत्या प्रवर्गातील आहे या माहितीसह मराठा आहात का, नसल्यास जात कोणती आहे. कुटुंब कोठे राहते, त्यांचे घर कोणत्या प्रकारचे आहे, किती वर्षापासून वास्तव्य करत आहात, गावाला जोडणारा रस्ता कसा आहे, गाव वा शहर हे बारमाही रस्त्याने जोडलेले आहे का, पावसाळ्यामध्ये इतर गावांशी संपर्क तुटतो का, गावामध्ये नदी असल्यास जोडणारा पूल आहे का या प्रश्नांची उत्तरे देणे यात अपेक्षित आहे.कौंटुबिक माहितीकौंटुबिक माहितीमध्ये कुटुंब नेमके कोणत्या प्रकारचे आहे. पूर्वजांचे मूळ व सध्याच्या निवासस्थानाची तसेच महाराष्ट्रातल्या कुटुंबाच्या निवासाच्या कालावधीची माहिती देण्यास राज्यामध्ये निवासाचा कालावधी किती वर्षांचा आहे, जातीचा पारंपरिक व्यवसाय तसेच व्यवसाय बदलला असल्यास त्यामागील कारणे कोणती आहे. सरकारी-निमसरकारी सेवेमध्ये कोणी आहे का याचीही उत्तरे या प्रश्नावलीमध्ये विचारण्यात आली आहेत.आर्थिक स्थितीआर्थिक स्थितीसंदर्भात माहिती देताना उत्पन्नाचा स्रोत, घराचे क्षेत्रफळ यासह पाण्याचा स्रोत घरापासून किती अंतरावर आहे, पाणी कुठून आणावे लागते. स्वयंपाक करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतात ही माहितीही यामध्ये देणे अपेक्षित आहे. शेतजमीनीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांमध्ये जमिनीची मालकी कुणाकडे आहे. जमिनीचे क्षेत्रफळ, शेतजमीन बटाईने करायला घेतली आहे का, शेतीला पाणी देण्यासाठी वीज किती तास उपलब्ध होते, तसेच शेतीसह पूरक व्यवसाय आहेत का? या प्रश्नांची उत्तरेही यात मागितली आहेत.कर्जाचे कारण- सर्वेक्षणामध्ये संबधित व्यक्तीने मागील १५ वर्षांमध्ये कृषिकर्ज घेतले होते का?- घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती?, हे कर्ज फिटले का?- सध्या असलेल्या कर्जाचे कारण काय आहे?- कर्ज कोणाकडून काढले, तारण रक्कम कोणती ठेवली?- कर्ज घेताना कोणती मालमत्ता ताब्यात घेतली, बॅकेचे कर्ज कोणत्या कारणांमुळे नाकारले गेले का? याचीही माहिती देणे अपेक्षित आहे.इतर प्रश्नमहिला इतरांच्या घरी धुणीभांडी करायला, झाडलोट करायला जातात का, स्त्री-पुरुष गुरेढोरे चरायला नेण्याचे काम करतात का, कुटुंबाचे स्थलांतरण का झाले या प्रश्नांची उत्तरे या प्रश्नावलीमध्ये विचारण्यात आली आहेत.सरकारी योजनांचा लाभसरकारी योजनांचा लाभ घेताना कोणत्या कल्याण योजनांचा लाभ कुटुंबाला झाला या प्रश्नासह समाजामध्ये लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का, विधवांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का, विधवा स्त्रिया औक्षण करू शकतात का, विधुरांचे पुनर्विवाह होतात का, विधवा स्त्रियांना धार्मिक कार्य, पूजापाठ करू दिले जाते का, त्यांना हळदीकुंकू सारख्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केले जाते का, विधवांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का, महिलांना पडदा पद्धत आहे का, सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सहभागी होऊ शकतात का, मुलींचे लग्न १२ ते २१ च्या पुढे यातील कोणत्या वयोगटामध्ये केले जातेकुटुंबाचे आरोग्यकुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास वैद्यकीय सल्ल्यासाठी वा वैद्यकीय उपचारासाठी कुठे जातात. घरगुती उपचार केले जातात की खासगी डॉक्टरांकडे नेले जाते. तांत्रिकाकडे जातात का या प्रश्नाचा शोध घेण्यात आला आहे. महिलांची बाळंतपणे कुठे होतात, कुत्रा-माकड चावल्यास कुणाकडे उपचारासाठी नेले जाते. बालमृत्यू कुपोषणामुळे बालमृत्यू झाला आहे का? तसेच मानसिक आरोग्य बिघडल्यास मानसिक आरोग्यसेवा मिळतात का, या प्रश्नांचाही यात समावेश आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7oi0KMZ

No comments:

Post a Comment