Breaking

Wednesday, January 17, 2024

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय, रवी बिश्नोई ठरला हिरो https://ift.tt/QiUCzwJ

बंगळुरु : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-२० सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. अफगाणिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती, त्यांनी १८ धावा केल्या आणि हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने दमदार फलंदाजी केली आणि १६ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी १७ धावांची गरज होती. भारतानेही यावेळी १६ धावा केल्या आणि पुन्हा एकदा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताला ११ धावा करता आल्या आणि अफगाणिस्तानला विजयासाठी १२ धावांचे आव्हान होते. पण रवी बिश्नोईने तीन चेंडूत ोन विकेट्स काढत भारताला १० धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने ही टी-२० मालिका ३-० अशी जिंकली आहे. सुपर ओव्हरमध्ये भारताने भारताने प्रथम फलंदाजी करताना फक्त चार धावांत चार फलंदजा गमावले होते. भारताची बिन बाद १८ अशी धावसंख्या होती. पण पाचव्या षटकात भारताची ४ बाद २२ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर रोहित शर्माने रिंकू सिंगला आपल्या साथीला घेतले आणि धावांचा डोंगर उभारला. यावेळी रोहित आणि रिंकू यांनी गोलंदाजांची दाणादाण उडवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १९० धावांची नाबाद भागीदारी रचली. यामध्ये रोहित शर्माची शतकी खेळी ही कौतुकाचा विषय ठरली. रोहितने सुरुवात संथपणे केली असली तरी एकदा सेट झाल्यावर त्याने गोलंदाजांची पिसे काढली. रोहितने यावेळी फक्त ६९ चेंडूंत ११ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद १२१ धावांची खेळी साकारली. रोहितचे हे टी-२० क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले. रिंकूनेही यावेळी रोहितला चांगली साथ दिली. रिंकूने यावेळी ३९ चेंडूंत २ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ६९ धावा केल्या. या दोघांच्या दणकेबाज फटकेबाजीमुळे भारताला अफगाणिस्तानपुढे २१३ धावांचे आव्हान ठेवता आले.भारताच्या २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे अफगाणिस्तानला ९३ धावांची सलामी मिळाली, त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक झळकावले. पण कुलदीप यादवने सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाझला ५० धावांवर बाद केले आणि तिथे त्यांच्या डावाला मोठा धक्का बसला. त्यानंतर भारताने ही संधी सोडली नाही. भारताच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केला. पण गुलबदीन नैबने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचवला. नैबने यावेळी अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना दोन धावा घेतल्या आणि हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3UnbEDC

No comments:

Post a Comment