नागपूर: पतंग पकडताना दोन भाऊ कालव्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत नागरिकांच्या सतकर्तने मोठा भाऊ थोडक्यात बचावला तर दुसरा बुडाला. ही खळबळजनक घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे घडली. दयाशंकर अवधेश प्रजापती (८), असे बुडालेल्या तर कैलास (१२),असे बचालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोघेही महादुला परिसरात पतंग उडवित होते. त्यांची पतंग कापली. त्यामुळे ती कोराडी ऊर्जा प्रकल्पाजवळील कालव्यात पडली. तिला पकडण्यासाठी दयाशंकरने कालव्यात उडी घेतली. पाण्याच्या प्रवाहाने तो वाहायला लागला. त्याला वाचविण्यासाठी कैलासनेही नदी उडी मारली. नागरिकांना तो दिसला. नागरिकांनी धाव घेत कैलासला बाहेर काढले. लहान भाऊ वाहून गेल्याचे त्याने नागरिकांना सांगितले. एका नागरिकाने कोराडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेतन कदम, साहाय्यक पोलीस आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. दयाशंकरचा शोध घेण्यासाठी पट्टीचे पोहणारे जगदीश खरे आणि अनिल यांना बोलाविण्यात आले. दोघांनी चार किलोमीटरपर्यंत दयाशंकरचा शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. रात्र झाल्याने शोध थांबविण्यात आला. उद्या, गुरुवारी पुन्हा त्याचा शोध घेण्यात येणार आहे. दयाशंकर हा तिसऱ्या वर्गात शिकत असून त्याचे वडील मडके आणि दिवे बनविण्याचे काम करतात. कैलास हा सातव्या वर्गात शिकतो. या घटनेने प्रजापती कुटुंब जबर धक्क्यात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/O7tnSMq
No comments:
Post a Comment