मुंबई : पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी, तर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेले पी. वेलरासू यांची मंत्रालयात सामाजिक न्याय आणि विशेष साह्य विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.चहल हे गेले पावणेचार वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्त होते. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या किंवा मूळ जिल्ह्यात नियुक्ती असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. मात्र, या निर्देशांकडे सरकारकडून काणाडोळा करण्यात आल्याचे बोलले जात होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने बदलीसाठी पात्र असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार २० मार्च २०२४ रोजी निवडणूक आयोगाने चहल यांना आयुक्तपदावरून दूर केले होते. त्यानंतर शुक्रवारी चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी लावण्यात आली.
‘मुंबई लुटल्याची बक्षिसी’
‘मी दोन दिवसांपूर्वी भाकीत केले होते, अगदी तसेच घडत आहे. मुंबई महापालिकेचे भ्रष्ट माजी आयुक्त आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त झाले आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती झाली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल मिळालेले हे बक्षीस आहे,’ अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते यांनी ‘एक्स’वरून केली. Read And आदित्य ठाकरेंच्या टीकेला सत्ताधारी पक्षातून काय उत्तर मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Aj16Ddh
No comments:
Post a Comment