Breaking

Friday, March 15, 2024

तुरुंगात शिक्षा भोगत असताना राजपाल यादवने असे काही केले की पोलिसही झाले इम्प्रेस! काय घडलं नेमकं https://ift.tt/3jLOtYa

मुंबई- हा असा अभिनेता आहे ज्याने इंडस्ट्रीत आपल्या विनोदी अभिनयाने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांसोबतच राजपाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. आज अभिनेता आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सिनेमात राजपाल याजवचा सीन चालू असेल तर प्रेक्षक खळखळून हसतात. पण काही वर्षांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले होते. राजपाल यादवने ५ कोटी रुपयांच्या कर्ज थकवल्यामुळे २०१८ मध्ये त्याला तीन महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. कैद्यांसाठी केले वर्कशॉपचे आयोजन राजपाल यादवने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत आपल्या तुरुंगातील दिवसांबद्दल सांगितले, तुरुंगात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सोबत असलेल्या कैद्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. अभिनेत्याने सांगितले की, लोक कलेशी जोडले जावेत, कलाप्रेमी व्हावे, हा या वर्कशॉपच्या आयोजनामागचा माझा उद्देश होता. वर्कशॉपच्या दुस-या दिवशी ज्यांना जीवनात पुढे जाण्याची, काही करण्याची इच्छा नव्हती किंवा जीवनाला दिशा नाही अशा व्यक्तींनी हसत हसत अभिनयाला सुरुवात केली. कारागृह अधीक्षकांनी केले कौतुक राजपाल यादवने सांगितले की, तुरुंग अधिकारी माझ्या उत्साही व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी माझे कौतुकही केले. अभिनेता म्हणाला, 'जेव्हा मी तीन महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर पडत होतो, तेव्हा तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मला एक ऐवजी दोन प्रमाणपत्रे दिली. ते म्हणाले की हे ठिकाण खूप ऐतिहासिक आहे आणि आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यात तुमच्यासारखे कोणी पाहिले नाही. आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळाली. आम्हाला वाटलेले की आम्ही रोज तुमच्याकडून तक्रारी ऐकू पण या तीन महिन्यांत तुम्ही या भिंतींना जीवदान दिले आहे. इंडस्ट्रीचे मानले आभार आपल्यावर संशय न घेतल्याबद्दल अभिनेत्याने चित्रपटसृष्टीचे आभार मानले. तो म्हणाला की, जर मी गोंधळलो असतो, घाबरलो असतो तर लोकांनी मला नक्कीच जज केले अशते, परंतु मला माहित आहे की मी १०० पट अधिक मजबूत आणि चांगला होऊन बाहेर येईल कारण मी फिनिक्स बनून माझ्या आयुष्यातील वाईट टप्प्यातून बाहेर आला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DG9AgW6

No comments:

Post a Comment