Breaking

Sunday, March 31, 2024

धोनी फलंदाजीला आल्यावर चाहत्यांनी कसं केलं भन्नाट स्वागत, पाहा खास व्हिडिओ... https://ift.tt/GNaR7wO

विशाखापट्टणम : महेंद्रसिंग धोनी या आयपीएलमध्ये रविवारी प्रथमच फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी मैदानातील प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. धोनीच्या आगमनाचा हा व्हिडिओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.ही गोष्ट घडली ती १७ व्या षटकात. हे १७ वं षटक दिल्लीचा मुकेश कुमार टाकत होता. या १७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मुकेश कुमारने शिवम दुबेला बाद केले. शिवम बाद झाला धोनी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. धोनी मैदानात उतरला आणि त्यावेळी त्याच्या नावाचा कच जयघोष सुरु झाला. संपूर्ण मैदानात फक्त धोनी... धोनी... हा नारा घुमत होती. चेन्नईचा संघ खरं तर त्यावेळी अडचणीत होता. पण धोनी मैदानात आल्यावर सर्व काही ठीक करेल, हा विश्वाच चेन्नईच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. धोनीच्या नावाचे बरेच फलक मैदानात झळकाताना पाहायला मिळत होते. धोनी मैदानात आल्यापासून तो खेळपट्टीवर पोहोचेपर्यंत धोनीच्या नावाचा नारा सुरु होता. धोनी मैदानात येऊन रवींद्र जडेजाला भेटला. त्यानंतरही हे नारे सुरुच होते. धोनीने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळालं. धोनी यावेळी भन्नाट फॉर्मात होता. मैदानात येण्यापूर्वीच तो कसून सराव करून आल्यासारखे वाटत होते. कारण धोनीची जोरदार फटकेबाजी यावेळी पाहायला मिळत होती. धोनीने या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरही चौकार वसूल केला आणि चाहत्यांना विजयाची आशा दाखवली. त्यानंतर खलील अहमदच्या षटकात तर धोनीने धडाकेबाज षटकार लगावला आणि आल्याला कोणीही रोखू शकत नाही, हे देखवून दिले. धोनीने अखेरच्या षटकात दोन षटकार आणि दोन चौकार वसूल केले, २० धावा धोनीने या षटकात जमवल्या. धोनीने चेन्नईला सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामध्ये तो अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण दिल्ली कॅपिटल्सने यावेळी २० धावांनी हा सामना जिंकला. धोनीने यावेळी १६ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ३७ धावांची खेळी साकारली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Vm9o0YX

No comments:

Post a Comment