बीड : आमचा प्रारब्ध होता तो आज संपला आहे. आमचे कुटुंब एकत्र आले आहे. आता कोणाचा प्रारब्ध सुरू करायचा, ते आम्ही तिघे मिळून ठरवू, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते, मंत्री यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांची काय ऐपत आहे ? त्यांना साधं मुलीला ग्रामपंचायतला देखील निवडून आणता आलं नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केलेल्या बजरंग सोनवणेंवर टीका केली..यावेळी म्हणाल्या, की उमेदवारी मिळाल्यानंतर गोपीनाथ गडावर दर्शनासाठी पहिल्यांदा आले आहे. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत झाल्याने मार्ग गुपित ठेऊन गोपीनाथ गडावर यावं लागलं. माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं, मी तुमच्या घरी येईल. आमच्या काकूच्या आशीर्वाद घेण्यासाठी, अण्णांचे स्वागत घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात, तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही मला मदत करा. कारण सगळ्यांना मी मदत मागितली अन आपल्या घराला गृहीत धरलं नाही तर हे बरोबर दिसणार नाही. आज गोपीनाथ गडावर भाऊ आलाय. पालकमंत्र्याला भेटायला मी घरी जाणार आहे, खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागतासाठी आले, किती हेवी उमेदवार आहे मी, असं फटकेबाजी पंकजांनी केली.धनंजय मुंडे म्हणाले, "माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस आहे. ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचे स्वागत खरंतर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवर करायला सांगितलं होतं. मात्र त्यांनी सांगितलं तू पालकमंत्री आहेस. त्यामुळे तू घरी थांब. मी घरी येणार आहे भेटायला. पण शेवटी घरातला मी मोठा आहे. आजच्या भावनिक दिवशी कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्रिपदाचा विषय नाही. माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली, स्वागत करण्यासाठी मोठा भाऊ म्हणून असणार आहे"महायुतीतले मविआमध्ये कोण गेले आणि ते कशामुळे गेले? याची कारणे शोधले पाहिजे. त्यांची अतिमहत्वकांक्षा आणि मागच्या वेळेस आघाडी म्हणून आम्ही त्यांचं काम केलं. त्यांची काय ऐपत आहे? त्यांना त्यांच्या मुलीला ग्रामपंचायतमध्ये निवडून आणता आलं नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी यांच्यावर टीका केली.दरम्यान, आमचा प्रारब्ध होता, तो मात्र आज संपला आहे. आज सर्व कुटुंब इथे एकत्र आहोत. आता कोणाचा प्रारब्ध चालू करायचा ते आम्ही तिघे ठरवू, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिलाय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aYOJ5G9
No comments:
Post a Comment