Breaking

Friday, March 1, 2024

पुणे-लोणावळा मार्गावर उद्या मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या वेळापत्रक https://ift.tt/QxZfFBh

म. टा. प्रतिनिधी, पुणे : मार्गावर तांत्रिक कामासाठी उद्या, रविवारी (३ मार्च) घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पुण्याहून लोणावळ्याला आणि लोणावळ्याहून पुण्याला येणाऱ्या लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७, ११.१७ दुपारी ३ आणि ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी सुटणारी दुपारी १२.०५, ३.४७, सायंकाळी ५.२० ची लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच, लोणावळ्याहून शिवाजीनगरला सकाळी १०.०५, ११.३०, सायंकाळी ५.३०, ६.०८ वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द केल्या आहेत. तळेगाव येथून पुण्यासाठी दुपारी ४.४० वाजता सुटणारी लोकल आणि लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० आणि संध्याकाळी सातची लोकल रद्द करण्यात आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DdCszwt

No comments:

Post a Comment