Breaking

Friday, March 1, 2024

यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक, उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढणार, हवामान विभागाचा इशारा https://ift.tt/9nQ2sJh

मुंबई : यंदाच्या थंडीमध्ये फारशा थंडीचा अनुभव न आल्याने उन्हाळा अधिक तापदायक ठरणार का, अशी शंका निर्माण झाली होती. ती खरी ठरणार असल्याची चिन्हे उन्हाळ्याच्या काळासाठीच्या पूर्वानुमानानुसार दिसत आहेत. शुक्रवारी १ मार्च रोजी भारतीय हवामान विभागातर्फे उन्हाळ्यासाठीचे पूर्वानुमान जाहीर केले. यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे या तीनही महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेच्या लाटांची वारंवारता सरासरीपेक्षा जास्त असू शकेल, असा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मार्चमध्ये महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.देशाच्या बहुतांश भागामध्ये पुढील तीनही महिन्यांमध्ये कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असेल. वायव्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारत येथील तुरळक भाग वगळता कमाल तापमानाचा पारा चढा असेल. किमान तापमानही या तीनही महिन्यांमध्ये सरासरी किमान तापमानाहून अधिक असेल. या तीनही महिन्यांमध्ये ईशान्य भारत, हिमालयाचा पश्चिमी भाग, पश्चिम किनारपट्टी, तसेच भारतीय द्विपकल्पाचा नैऋत्य भाग वगळता उर्वरित भारतामध्ये उष्णतेच्या लाटांची वारंवारता सरासरीहून अधिक असेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मार्चमध्ये ईशान्य भारत, दक्षिण भारत येथे उष्णतेच्या लाटा अधिक जाणवू शकतात. महाराष्ट्र, तसेच ओडिशाच्या काही भागातही याची तीव्रता वाढू शकते. मार्च महिन्यात ईशान्य, पश्चिम मध्य भारत, दक्षिण भारत येथे कमाल तापमान सरासरीहून अधिक असेल.पूर्व आणि पूर्व मध्य भारतात, तसेच वायव्य भारताचा काही भाग येथे कमाल तापमान सरासरीइतके किंवा सरासरीहून थोडे कमी असू शकेल. हिमालयीन भाग वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये मार्चमध्ये किमान तापमान सरासरीहून जास्त असेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रात उत्तर कोकणातही कमाल आणि किमान तापमान मार्च महिन्यामध्ये सरासरीहून जास्त असू शकेल, असे भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीवरून समोर आले आहे. मात्र उष्णतेच्या लाटांचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला तुलनेने कमी बसेल, अशी शक्यता असल्याने कोकण विभागातील नागरिकांना याचा त्रास तुलनेने कमी होईल, असाही अंदाज आहे.मार्चमध्ये देशातील एकूण पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्त असू शकते. भारताच्या दक्षिण द्विपकल्प भागातील आग्नेयेकडचा भाग वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये सरासरी किंवा त्याहून जास्त पाऊस पडू शकतो. देशाच्या ईशान्य आणि वायव्य भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरीटीम मटा : अवकाळी पावसाने शुक्रवारी सकाळी ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भागांत हजेरी लावली होती. पनवेलमध्येही पाऊस पडला असून अचानक आलेल्या पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार आदी विविध ठिकाणी शुक्रवारी सकाळी तुरळक पाऊस पडला. त्य़ामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांसह विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. ठाणे शहरात सकाळी तुरळक पाऊस पडला. शहरातील वातावरण ढगाळच होते. कल्याण-डोंबिवलीतील अनेक रस्त्यांवर तेल पडलेले असल्याने त्यावर पावसाचे पाणी पडताच ते निसरडे झाले. यामुळे दुचाकी घसरल्याचे प्रकार घडले. त्यामध्ये विद्यार्थी जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी योग्य केला. नवी मुंबईत पहाटे पावसाचे आगमन झाले होते. दुसरीकडे पनवेल परिसरात १५ ते २० मिनिटे पावसाची रिमझिम चालू होती. वसई-विरारमधील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KmXF9Dd

No comments:

Post a Comment