Breaking

Sunday, March 10, 2024

दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बोट गाळात रुतली, ५०० हून अधिक प्रवासी अडकले, मोरा बंदराजवळील घटना https://ift.tt/UuSh4BE

नवी मुंबई: महाशिवरात्रीनिमित्त घारापुरी बेटाकडे दर्शनाला निघालेल्या भाविकांची बोट गाळात रुतल्याची घटना घडली आहे. शिवअवतारच्या दर्शनासाठी घारापुरी लेणीवर भक्तांची अलोट गर्दी होत असते. मोरा बंदरवरून घारापुरी बेटाकडे भक्तांना शिव दर्शनासाठी घेऊन गेलेल्या तीन बोट गाळात रुतल्याने प्रवासी भयभीत झाले होते. यामध्ये सुमारे ५०० पेक्षा अधिक प्रवासी हे उरण नजीकच्या मोरा बंदरातील गाळात बोट रुतल्याने अडकून पडले होते. ओहटीच्या सुमारास समुद्राचे पाणी कमी झाल्याने प्रवाशांनी भरलेल्या बोटी ह्या गाळात रुतल्या होत्या.मुंबईच्या नजीक असलेल्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्त हजारो भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घारापुरी येथे असलेल्या शिवलेणी आणि त्रिमूर्तीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. मात्र यावेळी मोठी दुर्घटना घडली असती. भक्तांना घेऊन गेलेल्या तीन बोटी गाळात रुतल्याने प्रवासी भयभीत झाले होते. यामध्ये सुमारे ५०० पेक्षा अधिक प्रवासी हे उरणनजीकच्या मोरा बंदरातील गाळात बोट रुतल्याने अडकून पडले होते. महाशिवरात्रीनिमित्ताने शुक्रवारी त्रिमूर्ती आणि शिव अवताराच्या दर्शनासाठी घारापुरी लेणीवर भक्तांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी शिवभक्तांच्या सुरक्षितता आणि जाण्या-येण्याची व्यवस्था पोलीस, बंदर, महसूल यंत्रणेसह ग्रामपंचायत, नागरी सुरक्षा दल आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी सोय केली होती. घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोरा बंदर ते घारापुरी बोटींची सोय करण्यात आली होती. मात्र यावेळी मोठी दुर्घटना टळली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/E3jgKhP

No comments:

Post a Comment