वृत्तसंस्था, ओहियो (अमेरिका)‘आगामी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाची निवडणूक आपण जिंकलो नाही, तर अमेरिकन लोकशाही संपुष्टात येईल. देशात रक्तपात होईल,’ असे धक्कादायक विधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि सध्या अध्यक्षपदाच्या रणांगणात उतरलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते यांनी केले. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून, ओहियो येथे शनिवारी आपल्या समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी, हे वादग्रस्त विधान केले. ट्रम्प म्हणाले, ‘५ नोव्हेंबरची तारीख लक्षात ठेवा, मला वाटते ही आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची तारीख असेल.’ आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दक्षिणेकडील सीमेपलीकडून येणाऱ्या निर्वासितांबद्दलही अव्यवहार्य भाषेचा वाापर केला. ‘मला माहीत नाही की, तुम्ही या लोकांना ‘मानव’ म्हणता का? पण माझ्या मते, हे लोक मानव नाहीत’, असे म्हणत ट्रम्प यांनी नंतर निर्वासितांची ‘प्राणी’ अशी संभावना केली. सन २०२०च्या निवडणुकीत जो बायडेन यांच्याकडून झालेला पराभव हा फसवणुकीचा परिणाम असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. ‘आपण ही निवडणूक जिंकलो नाही, तर मला वाटत नाही की, या देशात दुसरी निवडणूक होईल’, असे ते यावेळी म्हणाले. यासोबतच ट्रम्प यांनी २०२० मध्ये अध्यक्षपदाची निवडणुकीचा निकाल स्वीकारण्यास नकार देणाऱ्यांचे कौतुक केले. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरेशा प्रतिनिधींची मते मिळवली होती. तसेच सन २०२४मध्ये पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास संसदेवरील हल्ल्यातील आरोपींची सुटका करू, असेही विधान त्यांनी अलीकडेच केले होते.नोव्हेंबर २०२४मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोघांचीही आपापल्या पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी निवड झाली आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी जो बायडेन यांनी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव केला होता. यानंतर ट्रम्प यांनी आपल्या हजारो समर्थकांसह संसदेवर हल्लाबोल केला होता. याप्रकरणी १३५८ जणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SnTYxy6
No comments:
Post a Comment