नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना युजर्सकडून असा दावा केला जात आहे, की नेपाळच्या सभागृहातून पंतप्रधान मोदींवर टीका होत आहे. मात्र, बूम या वेबसाइटने या व्हिडिओची चौकशी केली असता सत्य काही वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेपाळचा नसून हिमाचल प्रदेश विधानसभेचा आहे. इथे कन्नौजचे काँग्रेस आमदार जगतसिंह नेगी भाषण करत होते. व्हिडिओ शेअर करत युजरने उपरोधिकपणे लिहिले की, 'भारताचे प्रसिद्ध, यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नेपाळमध्येही आपला डंका वाजवत आहेत. नेपाळच्या संसदेत नेपाळचे खासदार मोदींबद्दल जे काही बोलले, त्याबद्दल उद्या किंवा मतदान केंद्रावर गेल्यावर प्रत्येक भारतीयाने हा व्हिडिओ जरुर पाहावा'. आर्काइव पोस्ट पाहा.एक्सवर व्हिडिओ शेअर करत एका युजरनेही लिहिलंय, नेपाळच्या संसदेत नेपाळचे खासदार मोदींबद्दल जे काही बोलले तो व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने ज्यावेळी मत देण्यासाठी बूथवर जाल तेव्हा जरूर पाहावा. आर्काइव पोस्ट पाहा.व्हिडिओचं सत्य कसं समोर आलं? ज्यावेळी बूमने या व्हिडिओचा तपास सुरू केला, त्यावेळी एक मिनिट ५७ सेकंदावर सभागृहाचे अध्यक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाचा संदर्भ घेत असल्याचं ऐकण्यात आलं. त्यानंतर तेच शब्द गुगलवर सर्च केले असता हा व्हिडिओ हिमाचल प्रदेश विधानसभेचा असल्याचं समोर आलं. बूमला च्या यूट्यूब चॅनेलवर १७ मार्च २०२१ चा व्हिडिओ मिळाला. व्हिडिओला 'जगतसिंग नेगींनी सभागृहात भाजपला जोरदार फटकारले' असं हेडिंग देण्यात आलं होतं. त्याशिवाय हा व्हिडिओ काँग्रेसनेही २१ मार्च २०२१ रोजी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. 'कन्नौजचे काँग्रेस आमदार जगत सिंह नेगी यांच्याकडून देशाच्या महान आणि यशस्वी पंतप्रधानांबद्दल ऐका.' असं कॅप्शन त्या पोस्टला देण्यात आलं होतं.निष्कर्ष बूमच्या पडताळणीत या व्हिडिओबाबत केला जाणारा दावा खोटा निघाला आहे. हा व्हिडिओ नेपाळच्या संसदेतील नाही. तर हा व्हिडिओ ३ वर्षे जुना असून तो हिमाचल प्रदेश विधानसभेचा आहे.(This story was originally published by , and republished by MT as part of the Shakti Collective.)
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rGB9uxe
No comments:
Post a Comment