निलेश पाटील, जळगाव: एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. यातच रोहिणी खडसे यादेखील प्रवेश करणार असल्याचे चर्चा होत्या. मात्र रोहिणी खडसे यांनी ट्विट करत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये सांगितले की, मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आहे आणि भविष्यातही यात पक्षात राहणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एकनाथ खडसे यांना भाजपात जायचे असेल तर स्थानिक नेत्यांना विचारण्याची आवश्यकता आहे. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते अमित शहा पक्षाध्यक्ष यांच्यापर्यंत संबंध आहे. त्यामुळे मला जायचे असेल तर मी थेट भाजप पक्षात प्रवेश करेल, असे ते वारंवार सांगत होते. गेल्या चार दिवसांपूर्वीच खडसे दिल्लीवरून परतल्यानंतर त्यांचा भाजपात प्रवेश झाला असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने जाहीर केले होते. याबाबत एकनाथ खडसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तूर्तास माझा भाजप प्रवेश नाही. मी सर्वांना सोबत घेऊन भाजप प्रवेश करणार, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे मी जेव्हाही जाईल तेव्हा सर्वांना सोबत घेऊन जाणार. या बरोबरच एक रोहिणी खडसे देखील खडसे यांच्यासोबत भाजपात प्रवेश करणार या चर्चा सुरू होत्या. रोहिणी खडसे यांनी ट्विट करत सांगितले की, 'मी महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहे. मी याच पक्षात आहे. भविष्यातही याच पक्षात राहणार आहे' असे ट्विट केले. यामुळे रोहिणी खडसे या एकनाथराव खडसे यांच्यासोबत भाजप पक्षात प्रवेश करणार नसल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cYahrsw
No comments:
Post a Comment