अमुलकुमार जैन, रायगड : कोकणात रायगड लोकसभा मतदारसंघात आमदार व यांचे पूर्वी टोकाचे राजकीय वैमनस्य होते. मात्र राज्यात झालेल्या दुसर्या मोठ्या राजकीय भूकंपानंतरही गोगावले यांनी तटकरे यांच्या जवळ जुळवून घेतले नव्हते, तर गोगावले यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण अलीकडे काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार या तिन्ही नेत्यांनी रायगड दौऱ्यावर एकत्र आले असताना या दोघांमध्ये दिलजमाई केली आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील आता वाद मिटले आहेत. कार्यक्रमाच सर्वांना एकत्र सामोरे जात आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या जाहीर सभेत आज आमदार भरत गोगवले यांनी आमची पण निवडून आणण्याची गॅरंटी घ्या, असं सांगत आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्याने अजूनही शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या नेत्यांना खासदार सुनील तटकरे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवणे या नेत्यांना जड जात आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. रायगड लोकसभा मतदार संघात घड्याळ चिन्हावर बटन दाबून मतदान करायचे आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सुनील तटकरे यांना मतदान करायचे आहे. मोदींची विकासाची गॅरंटी आहे तशी या मतदार संघातून तटकरे यांना निवडून आणण्याची आमची (शिंदे गटाची) गॅरंटी आहे. असे प्रतिपदन शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अलिबाग येथे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचार सभेच्या वेळी केले. शिवसेनेचे प्रतोद आ. भरत गोगावले, यांनी घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचा बटन दाबून आपल्याला महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मताधिक्याने निवडून आणायचे आहे असे सांगताना पंतप्रधान मोदी जशी गॅरंटी आहे तशी खासदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आमची गॅरंटी घ्यावी, असे आवाहन केले. सुनील तटकरे यांना प्रचंड फरकाने निवडून आणण्याची गॅरंटी आम्ही घेऊ. पण तटकरे निवडून आल्यानंतर त्यांनी विधानसभेला निवडून आणण्याची गॅरंटी घ्यावी अशी खंत शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली आहे. तसेच रायगड लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघात जो अधिक लीड तटकरे ना मिळून देईल त्यांना जास्त निधी द्या असेही आमदार गोगावले यांनी म्हटले आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघात जो अधिक लीड तटकरे ना मिळून देईल त्यांना जास्त निधी द्या असेही आमदार गोगावले यांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/THFaS46
No comments:
Post a Comment