अहमदनगर: मांजरीला वाचवताना बायोगॅसच्या खड्ड्यात सहा जण बुडाले असून एकाला वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी येथे घडली आहे. या धक्कादायक घटनेने नेवासा परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेत ५ पाच जण बुडाले आहे. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब गायकवाड असे बुडलेल्यांची नावे आहे. नेवासा तालुक्यातील वाकडी येथील शोष खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांना वाचवण्यामध्ये प्रशासनाचे अपयश आले आहे. चार ते पाच तास उलटून गेल्यानंतर अद्यापही या व्यक्तींना बाहेर न काढल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये वाकडी या ठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. नेवासा तालुक्यामध्ये साधारण सायंकाळी चारच्या दरम्यान एकाच कुटुंबातील सहा व्यक्ती विहिरीच्या शोष खड्ड्यामध्ये पडल्याची घटना घडली होती. त्याला आता पाच तास उलटून गेले तरीही प्रशासनाची कोणतीही कारवाई होत नसल्याने वाकडी परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाचे विरोधामध्ये रोष निर्माण होत आहे. नेवासा तालुका प्रशासनाकडे आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध नसल्याने तीन तासांहून अधिक काळ बुडालेल्या पाच जणांचा शोध घेण्यास प्रशासनास अपयश आले. रात्री नऊ वाजेपर्यंत ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. नागरिकांच्या वतीने शोष खड्ड्यामधील गॅस जाळण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु तो अपयशी ठरला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/u1cyM4z
No comments:
Post a Comment