Breaking

Wednesday, April 10, 2024

छत्रपती संभाजीनगरचा तिढा सुटणार? महायुतीचा उमेदवार आज होणार जाहीर, शिरसाट यांचा दावा https://ift.tt/lJhXsVc

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा व पर्यायाने शिवसेनेचा उमेदवार उद्या, गुरुवारी जाहीर होईल असा दावा शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. महायुतीच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या सभांचे राज्यभर आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.संजय शिरसाट माध्यमांशी बोलताना म्हणाले, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा आजच (बुधवारी) होणार होती, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेकला गेल्यामुळे उमेदवाराची घोषणा गुरुवारी होईल. मुख्यमंत्री योग्य उमेदवाराची घोषणा करतील असा उल्लेख त्यांनी केला. क्विक सर्व्हेची चर्चा सध्या सुरु आहे, याबद्दल शिरसाट यांना विचारले असता त्यांनी सर्व्हेचा विषय धुडकावून लाावला. सर्व्हेचा विषय नाही, उमेदवाराबद्दल चर्चेचीदेखील गरज नाही असे त्यांनी नमूद केले.राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे सांगताना संजय शिरसाट म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचे राज्यभर आयोजन करण्यात येणार आहे. मध्यंतरीच्या काळात ‘पंचेचाळीस प्लस’बद्दल आमच्या मनात शंका होती, पण राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे ‘पंचेचाळीस प्लस’ बद्दल विश्वास आला असल्याचे शिरसाट म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Hy3pTAi

No comments:

Post a Comment