विशाखापट्टणम: आणि अंगकृष्ण रघुवंशी यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद २७२ धावांची विक्रमी खेळी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी धावसंख्या ठरली. याच हंगामात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभी केली होती. हैदराबादचा विक्रम ६ धावांनी बचावला गेला. टॉस जिंकून केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सॉल्ट फक्त १८ धावांवर बाद झाला. पण सुनील नरेन याने धुवांधार फलंदाजी केली. त्याने फक्त ३९ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर ८५ धावा केल्या. त्याच्या जोडीला अंगकृष्ण रघुवंशी होता, त्याने २७ चेंडूत ३ ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या आंद्रे रसेलने १९ चेंडूत ४१ (४ चौकार आणि ३ षटकार) आणि रिंकू सिंगने फक्त ८ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह २६ धावांची खेळी केली. सुनील नरेनने दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. त्याचा स्ट्राइक रेट २१७ इतका होता. केकेआरच्या डावाची सुरुवात नरेन याने केली. त्याने ईशान शर्माला पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर शर्माच्या चौथ्या ओव्हरमध्ये नरेनने ६,६,४,०,६,४ अशा २६ धावा वसुल केल्या.केकेआरची फलंदाजीपाहून एक वेळ असे वाटते होते की, हैदराबादने केलेला विक्रम एका आठवड्याच्या आत मागे पडतोय की काय, पण केकेआरला २७२ धावा करता आल्या.दिल्लीची गोलंदाजीखलील अहमद- ४ ओव्हर ४३ धावा, १ विकेटईशांत शर्मा- ३ ओव्हर ४३ धावा, २ विकेटनॉर्जे- ४ ओव्हर ५९ धावा, ३ विकेटरसिक सलाम- २ ओव्हर १९ धावाअक्षर पटेल- १ ओव्हर १८ धावामिचेल मार्श-३ ओव्हर ३७ धावा, १ विकेट
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bLncpzW
No comments:
Post a Comment