लातूर: निलंगा येथील प्राध्यापक शेतकरी चांभरगे सर यांनी आपल्या शेतात 8 एकर शेतीत 600 आंब्याची लागवड केली आहे. यामध्ये त्यांच्या बजरंग आंब्याला जिल्ह्यातून सर्वात जास्त मागणी होते. उन्हाळा म्हटलं की आंबा आणि आंबा म्हटलं की हापूस केशर या सह अन्य आंब्याच्या प्रजाती आपणास परिचित आहेत. पण या प्रगत शेतकऱ्याने बजरंग नावाची आंब्याची प्रजाती तयार केली आहे. चांभरगे सरांनी आपल्या स्वतःच्या बागेमध्ये नवे संशोधन आणि मेहनत घेऊन संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केशर, बजरंग या सारख्या आंब्यांच्या जातींचा दर्जा अधिक उंचावला आहे. बाजार उपलब्ध असलेल्या आंब्यांपेक्षा ५ पट जास्त गोड, आकाराने मोठे पूर्ण निरोगी आणि पोषक मुलद्रव्यांनी युक्त असे हे आंबे बाजारातील एक्सपोर्ट क़्वालिटीच्या आंब्यांपेक्षा पेक्षा कित्येक पट्टीने हे आंबे दर्जेदार आणि उत्तम आहेत, अशी माहिती चांभरगे यांनी दिली.
तरुण शेतकऱ्यांनी फळबागेची शेतीकडे वळावे
मराठवाडा हा भाग पर्जन्यमानाच्या अनियमिततेने पाण्याची कमतरता येथे सतत जाणवते. यामुळे पारंपारिक शेतीच्या ऐवजी तरुण शेतकऱ्यांनी फळबागेची निवड करावी. यामध्ये आंबा चिंच पेरू अंजीर ड्रॅगन फूड या पद्धतीची शेती करून त्यातून मिळणारे उत्पादन व उत्पन्न हे दोन्ही परवडणारे आहे. शेतकऱ्यांनी फळबागेची निवड करावी, असा सल्ला चांभरगे यांनी दिला.पहिलीच काढणी आणि 4 लाखाचे उत्पन्न
पाच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या आंब्याचे उत्पादन यावर्षी 4 टन आत्तापर्यंत मिळाले आहे व अजून झाडाला काही आंबा शिल्लक आहे. रासायनिक पद्धतीने आंबा न पिकवता पारंपारिक पद्धतीने आंबा पिकवून विकल्याने याची मागणी ग्राहकांमध्ये जास्त होती. या माध्यमातून चार लाखाचे उत्पन्न आत्तापर्यंत प्राप्त झाले असून अजून मोठ्या प्रमाणात आंबा शिल्लक असल्याचे ते म्हणाले.सेंद्रिय पद्धतीने आंब्याची बाग
लागवडीपासून आजपर्यंत बागेमध्ये कुठल्याही स्वरूपाच्या रासायनिक खताचा वापर न करता केवळ सेंद्रिय पद्धतीने बाग फुलविण्यात आली आहे. विषमुक्त शेती ही आजच्या काळाची गरज असल्याचे ओळखून सेंद्रिय पद्धतीने फवारणी खत तसेच सर्व हे नैसर्गिक पद्धतीचे वापरल्यामुळे बाजारात या आंब्याला मागणी जास्त मिळत आहे. बजरंग नावाचा आंबा जवळपास एक किलोचा आंबा होतो आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4F6CE9B
No comments:
Post a Comment