नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर अनेक खोटे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ गुजरातमधील अदानी पोर्टच्या नावाने मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, अदानी बंदरातून मोठ्या प्रमाणात गायी इतर देशांमध्ये पाठवल्या जात आहेत. मात्र, तपासाअंती हा व्हिडिओ अदानी पोर्टचा नसून इतर कुठल्यातरी देशातील असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेल्या व्हिडिओचा गुजरातच्या बंदराशी संबंध नाही किंवा हा व्हिडिओ भारतातील कोणत्याही बंदराचा नाही.
काय आहे व्हायरल होणारा दावा?
सोशल मीडिया युजर ‘Adnan Hameed’ ने व्हायरल व्हिडिओ शेअर करत असं लिहिलंय, की (आर्काइव लिंक) अदानीच्या बंदरावर हजारो गायी ट्रकमध्ये उभ्या आहेत. अरब देशांमध्ये जाण्यासाठी... तिथे त्यांची कसली पूजा असेल? वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अनेक युजर्सनीही हा व्हिडिओ समान आणि मिळत्या-जुळत्या दाव्यांसह शेअर केला आहे. मात्र, तपासादरम्यान हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.काय आहे सत्य?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका बंदरावर गायींनी भरलेल्या ट्रकची लांबलचक रांग दिसत आहे आणि या व्हिडिओसह असा दावा केला जात आहे, की गुजरातमधील अदानी बंदरातून गायींच्या निर्यातीचा हा व्हिडिओ आहे. गोहत्येसाठी या गायी अरब देशांमध्ये पाठवल्या जात आहेत. पण या व्हिडिओचं सत्य जाणून घेण्यासाठी तपास करण्यात आला. त्यावेळी व्हायरल व्हिडिओचे की-फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर हा व्हिडिओ ‘Hamed ELhagary’ नावाच्या फेसबुक प्रोफाईलवर मिळाला. हा व्हिडिओ अरबी भाषेतील कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे. अरबीतील शब्दांचं भाषांतर केल्यानंतर अशी कोणतीही माहिती माहिती मिळाली नाही, ज्यात या व्हिडिओतील लोकेशनची माहिती मिळेल. व्हिडिओच्या तपासादरम्यान हा व्हिडिओ दुसऱ्या एका युजरच्या प्रोफाइलवर पोस्ट केलेला आढळला. पण कोणत्याही व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ गुजरात किंवा भारताशी संबंधित असल्याची माहिती नव्हती. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर, व्हिडिओमध्ये दोन लोक दिसले, ज्यांचा पोशाख साधारणपणे आखाती देशांतील लोकांसारखा आहे. व्हिडिओच्या लोकेशनची माहिती मिळण्यासाठी काही इतर की-फ्रेम्स पुन्हा रिव्हर्स इमेज सर्च केल्या. सर्चमध्ये Al Mayadeen Channel नावाचं यूट्यूब चॅनेलवर एका वर्षापूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ आढळला, जे इराकमधील कासर बंदर आहे. खाली दिलेल्या कोलाजमध्ये व्हायरल क्लिपमध्ये दिसत असलेली बंदराची समानता पाहता येईल.व्हायरल व्हिडिओचा अदानी बंदराशी कोणताही संबंध नाही
व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत अदानी समूहाच्या प्रवक्त्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी या व्हिडिओचा आमच्या कोणत्याही बंदराशी संबंध नाही, असं म्हटलं. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या apeda.gov.in ची वेबसाइट देखील तपासण्यात आली, जिथे भारतातून मांस निर्यातीचा डेटा उपलब्ध आहे. आकडेवारीनुसार, भारताच्या मांस निर्यातीमध्ये म्हशीच्या मांसाचा वाटा आहे. भारत सरकार गोमांस निर्यात करत नाही.सोशल मीडिया सर्चमध्ये Aabhas Maldahiyar च्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विट आरटीआय उत्तराची प्रत मिळाली. व्हायरल व्हिडिओ क्लिप शेअर करणाऱ्या युजरला फेसबुकवर २५ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. लोकसभा निवडणूक २०२४ साठी चालू असलेल्या मतदानादरम्यान, निवडणुकांशी संबंधित इतर दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट दाव्यांची चौकशी करणारा तथ्य तपासणी अहवाल विश्वास न्यूजच्या निवडणूक विभागात वाचता येईल.निष्कर्ष
गुजरातमधील अदानी बंदरातून अरब देशांमध्ये गायींची निर्यात केल्याचा दावा खोटा असून त्यासोबत व्हायरल होणारा व्हिडिओ हा भारतातील नसून इराकमधील बंदराचा आहे. हा व्हिडिओ या निवडणुकीच्या संदर्भात भारताच्या नावाने खोटा दावा करून शेअर केला जात आहे. (This story was originally published by , and republished by MT as part of the Shakti Collective.)from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kVoKX36
No comments:
Post a Comment