कोल्हापूर: पेन म्हणजेच लेखणी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच परिचित असणारी छोटीशी वस्तू. आपण जन्मल्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत सदैव छोटीशी वस्तू आपल्या सोबत असते. प्रत्येक व्यक्तीच्या खिशात असलेला पेन अनेकांच्या व्यक्तिमत्व देखील सांगून जातं. अगदी एक दोन रुपयांपासून सुरू झालेला पेनाचा प्रवास हा आता लाखो रुपयात तसेच विविध रूपात पोहोचला आहे. हाच पेनाचा प्रवास पाहण्याची संधी पहिल्यांदाच कोल्हापुरकरांना मिळत आहे. जगभरातील ५० हून अधिक नामांकित ब्रँडच्या पेनाचे प्रदर्शन सध्या कोल्हापुरात भरलं आहे. या प्रदर्शनात दोनशे रुपयांपासून ते ७ लाख रुपयांपर्यंतच्या विविध आकाराचे पेन आणि दुर्मिळ शाई पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.सुरुवातीच्या काळात पक्षांच्या पिसाऱ्यांपासून या पेनांचा सुरू झालेला प्रवास हा आज शाई पेन, बॉल पेन, जेल पेन ते अगदी डिजिटल पेन पर्यंत येऊन पोहोचला आहे. असे असले तरी शाई पेन प्रती पेन चाहात्यांचं असलेलं आकर्षण हे अद्याप कमी झालेलं नाही. अनेक मोठ्या प्रसंगी किंवा सुंदर हस्ताक्षरासाठी शाई पेनचा वापर अनेक जण करतात. यामुळे पेन चाहत्यांना विविध पेन आणि या पेनांचा प्रवास माहित व्हावा यासाठी कोल्हापुरातील हॉटेल सयाजी येथे बॉब अँड ची या संस्थेच्या वतीने हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात जगभरातील ५० हून अधिक नामांकित ब्रँडच्या तब्बल २००० हून अधिक फॉऊंटन पेन, रोलर पेन, बॉल पेन, मेकनाईज्ड पेन्सिल्स आणि उच्च दर्जाची दुर्मिळ शाई चा समावेश असून यासोबतच पेन ठेवण्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे खास पाऊस आणि केसेस ही येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या प्रदर्शनात पटना बिहार येथील पेन संग्राहक तसेच पेन विश्वातील जाणकार युसूफ मन्सूर यांनी संग्रहित केलेले तब्बल १२५ वर्षांपूर्वी पासूनचे पेन हे पेन चाहत्यांचे आकर्षण बिंदू ठरत आहेत.
इटलीत तयार झालेला ७ लाखांचा पेन ठरतोय आकर्षण
या पेन प्रदर्शनात सर्वाधिक आकर्षित करणारा पेन हा इटली येथे तयार झालेला ७ लाख रुपये किमतीचा पेन असून त्याचे चार प्रकारचे विविध डिझाईन पेन चाहत्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. पूर्णपणे हाताने तयार केलेल्या या पेनाची नीब ही सोन्याची आहे. हा पेन इटली येथील प्रसिद्ध कवी पॅराडाईस यांच्या जीवनावर हे पेन तयार करण्यात आले असून जगात केवळ ३३३ अशा पद्धतीचे पेन तयार करण्यात आले असून भारतात १५ पेन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हा पेन पाहून कोल्हापुरातील एका पेन चाहत्याने हा पेन खरेदी केला आहे. तसेच या पेनासाठी लागणारी शाई देखील येथे पाहायला मिळत आहे. तसेच किल्ल्यांचे डिझाईन केलेले, तांबा धातू पासून तयार केलेले पेन देखील येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर पु ल देशपांडे, डॉ ए पी जे अब्दुल कलाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर फाउंटन पेन, छत्रपती शिवाजी महाराज पेन व लहान मुलांसाठी चिंटू चे पेन खरेदीसाठी पेन चाहते गर्दी करत आहेत. तसेच बुलढाणा येथील हस्ताक्षर कलाकार गोपाल वाकोडे हे मराठीतून वेगवेगळ्या नावांचे वैविध्यपूर्ण स्वाक्षरी तयार करून घेत आहेत.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9biQmBY
No comments:
Post a Comment