Breaking

Tuesday, May 7, 2024

हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात; विधानसभेत कोणाकडे किती जागा? जाणून घ्या नंबर गेम https://ift.tt/lLaC0EP

चंदिगढ: देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना हरियाणा राज्यातील राजकीय घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले. राज्यातील यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या ३ अपक्ष आमदारांनी त्यांचे पाठिंबा मागे घेत काँग्रेसला समर्थन देत असल्याचे पत्रकार परिषदे घेऊन जाहीर केले. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ७ पैकी ४ अपक्ष आमदारांना काँग्रेसचा प्रकार करणार असल्याचे याआधीच जाहीर केले आहे. रणधीर गोलन, धर्मपाल गोंदर आणि सोमवीर सांगवान या तिघांनी सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय. हरियाणा विधानसभेची सदस्य संख्या ९० आहे. सरकार स्थापन करण्यासाठी ४६ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र सध्या विधानसभेच्या दोन जागा रिक्त असल्याने बहुमतासाठी ४५ आमदारांची गरज आहे. नंबरगेमचा विचार करता राज्यातील भाजप सरकार अल्पमतात आल्याचे दिसते. भाजपकडे ४० आमदार आहेत. त्यांना २ अपक्ष आणि हरियाणा लोकहित पार्टी (गोपाल कांडा)च्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. सध्या सैनी सरकारसोबत ४३ आमदार आहेत. विरोधकांकडे नजर टाकली तर काँग्रेसकडे ३०, आज सोबत आलेले ३ अपक्ष आमदार असे ३३चे बळ आहे. जेजेपीकडे १० आमदार आहेत. एक आमदार INLDचा आहे. या शिवाय आणखी एक अपक्ष आमदार आहे. राज्यात १२ मार्च रोजी नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सैनी यांच्या सरकराने आवाजी मतदानाने विश्वास दर्शक प्रस्ताव जिंकला होता. राज्यातील या घडामोडींवर भूपिंदर सिंह हुड्डा यांनी सैनी सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/on8ihuT

No comments:

Post a Comment