Breaking

Sunday, May 19, 2024

पोलिस विभागात खळबळ! पोलिस निरीक्षकाकडून हवालदाराच्या शिक्षित मुलीचा घरात शिरून विनयभंग https://ift.tt/pix5af7

(जितेंद्र खापरे) : पोलीस हवालदाराच्या शिक्षित मुलीला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने जाळ्यात अडकवले. तिच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय सायरे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरिक्षकाचे नाव आहे.यूपीएससीची तयारी करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप अकोला येथील खदान पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर आहे. या प्रकरणाने अकोला पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील नंदनवन परिसरात राहणारी २२ वर्षीय तरुणीचे वडील देखील पोलीस खात्यात आहेत. तिच्या वडिलांची धनंजयशी मैत्री होती. त्यामुळे धनंजय नेहमी घरी ये-जा करत असे. तरुणी यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती. दरम्यान, या ओळखीतून धनंजय सायरे याने मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, गेल्या काही दिवसांपासून धनंजयने तरुणीला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. धनंजय याने तरुणीला अनेक वेळा फोन केला मात्र तरुणीने त्याला उत्तर दिले नाही. त्यामुळे संतापलेला धनंजय शनिवारी सायंकाळी नागपुरात आला आणि तरुणीचा मोबाईल ट्रेस केला आणि त्याद्वारे तिचा लोकेशन ट्रेस करत तिचा राहत असलेल्या ठिकाणी पोहोचला. त्याने तिच्यावर शारीरिक संबंधांची मागणी करून जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. तिने नकार दिल्यावर तिचा लैंगिक छळ केला. त्यानंतर तरुणीने पोलीस ठाणे गाठत नंदनवन पोलिसात धनंजय सायरे याचा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे विरुद्ध भादंवि कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सध्या नंदनवन पोलीस अधिक तपास करत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/THgYZR5

No comments:

Post a Comment