Breaking

Tuesday, May 28, 2024

कौतुकास्पद! ५० वर्षीय महिला पोलीस अधिकाऱ्याने सर केला एव्हरेस्ट शिखर, जाणून घ्या प्रेरणादायी कहाणी https://ift.tt/WUP8p1Q

शिर्डी: नाव . वय ५० वर्षे. मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात राहणाऱ्या आणि सध्या नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी द्वारका यांच्या वाचनात "साद देती हिम शिखरे" हे पुस्तक आलं आणि त्यांना बर्फाच्छादित डोंगर सर करण्याचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी अनेक छोटे डोंगर सर केले. मात्र सर्वोच्च हिम शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या ध्येयाने त्यांना पछाडले आणि सुरू झाली त्यासाठीची मेहनत. द्वारका यांनी ३० मार्च २०२४ ला माऊंट एव्हरेस्ट चढायला सुरुवात केली. २२ मे ला म्हणजेच साधारण ५० दिवसांच्या प्रयत्नात त्या माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहचल्या.

द्वारका डोखे, एव्हरेस्ट सर करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी

सर्वोच्च शिखरावर पोहचात द्वारका यांनी भारताचा ध्वज हातात घेत राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकवत मानवंदना दिली आणि त्यानंतर दिवंगत आई वडिलांचा फोटो झळकवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात भाऊक करणारा क्षण होता अशी प्रतिक्रिया द्वारका डोखे यांनी दिली. एमपीएससी केल्यानंतर २००६ साली द्वारका महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या.. आज त्यांचे वय 50 वर्षे असून त्या नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. द्वारका अविवाहित असल्या तरी त्यांना नोकरी सोबत त्यांचे ध्येय गाठण्यासाठी कुटुंबीयांची मिळाली साथ आणि वरिष्ठांकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळे त्या एव्हढ्या मोठ्या विक्रमला गवसणी घालू शकल्या. श्रीरामपूर शहरात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तर सर्वच स्तरातून द्वारका यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. द्वारका डोखे यांनी नोकरीसह आपले ध्येय गाठण्यासाठी केलेली मेहनत आणि जिद्द नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच, प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रम करावेत असा संदेश देखील त्यांनी दिला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MIkiBEh

No comments:

Post a Comment