मुंबई : पावसामुळे मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना थांबवण्यात आला होता. पण पाऊस थांबला आणि त्यानंतर मुंबईच्या संघाला किती षटकांमध्ये किती धावांचे टार्गेट देण्यात आले, ते समीकरण समोर आले आहे.लखनौच्या २१५ धावांचा पाठला करताना मुंबईच्या संघाने दमदार सुरुवात केली होती. मुंबईचा ३.५ षटकांचा खेळ झाला होता, त्यावेळी त्यांची बिन बाद ३३ अशी स्थिती होती. त्यावेळी रोहित शर्माने १३ चेंडूंत २० धावा केल्या होत्या, यामध्ये १ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. मुंबईचा दुसरा सलामीवीर डेव्हाल्ड ब्रेव्हिसने यावेळी १० चेंडूंत ९ धावा केल्या होत्या. ही जोडी स्थिरस्थावर होत होती आणि त्यावेळीच पावसाचे आगमन झाले.मुंबईसाठी हा आयपीएलमधी अखेरचा सामना होता. त्यामुळे हा सामना जिंकत शेवट गोड करण्याचा प्रयत्न मुंबईच्या संघाचा होता. पण दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्ससाठी हा करो या मरो सामना होता. कारण हा सामना जिंकून त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता येऊ शकत होते. पण हा सामना त्यांनी गमावला तर त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार होते. त्यामुळे लखनौसाठी हा करो या मरो, असाच सामना होता. त्यामुळे हा सामना होणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली होती.पाऊस थोड्या वेळाने थांबला आणि त्यानंतर दोन्ही पंचांनी मैदानाची पाहणी केली. पण पावसामुळे जवळपास अर्धा तास वाया गेला होता. पाऊस थांबल्यावर मैदान सुकवण्यात आले आणि त्यानंतर हा सामना किती षटकांचा खेळवायचा, याचा निर्णय घेतला गेला. पावसामुळे वेळ वाया गेला असला तरी एकही षटक कमी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबईला विजयासाठी २० षटकांत २१५ धावा कराव्या लागतील.मुंबईच्या संघाला पावसामुळे मोठा फटका बसू शकतो. कारण पाऊस पडल्यावर खेळपट्टी थोडी ओलसर राहते आणि त्यामुळे वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते. त्यामुळे पावसानंतर मुंबईचे फलंदाज कशी फटकेबाजी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मुंबईसाठी एक गोष्ट चांगली होती की, त्यांनी एकही विकेट गमावलेली नव्हती. त्यामुळेच मुंबईचा संघ कशी फलंदाजी करतो, याची उत्सुकता चाहत्यांना होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wLqgTvS
No comments:
Post a Comment