गजानन पवार, हिंगोली: हिंगोली विधानसभेचे माजी आमदार यांचं आज (२६) मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वार्धक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. माजी आमदार गलंडे यांच्या निधनाने जिल्हाभरात शोककळा पसरली आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघातून (१९७८) माजी आमदार दगडूजी गलंडे जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. तसेच त्यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर कामे करून नावलौकिक प्राप्त केला होता. त्यांनी विनोबा भावे यांच्या समवेत भूदान चळवळीत पदयात्रा आदी बाबत योगदान दिलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज आदींच्या विचारसरणी आणि शिकवणीचा प्रसार प्रचार आपल्या बुलंद आवाजात केलेला होता. वैचारिक संमेलने, व्यासपीठ त्यांनी गाजवली. त्या काळातील अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्या समवेत सेवा कार्य केलं असून वयोमान आणि पदाची परवा न करता वृद्ध मंडळी समवेत बालकांसोबत देखील ते समरस आनंद निर्माण करत होते. सेवाभावी लोकसेवक स्वातंत्र्य सैनानी असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी दिलेलं योगदान तसेच राष्ट्रीय समाजसेवी मंडळी समावेश त्यांनी केलेली देशाची सेवा प्रेरणादायी उच्च विचार म्हणून त्यांना ओळखले जायचे. सकाळी (२७) रोजी त्यांच्या मुळगावी बाभूळगावी १० वाजता अंत्यविधी होणार असल्याची माहिती नातेवाईकांकडून प्राप्त झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OqYN0hf
No comments:
Post a Comment