Breaking

Thursday, May 23, 2024

Nashik : मी कालूचा भाचा नव्हे, PSI बोलतोय! जिल्हा रुग्णालयात तरुणाचा गोंधळ, घटनेनं पोलिस यंत्रणाही चक्रावली https://ift.tt/cuPmEr9

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात महिलांचा व्हिडीओ केल्याच्या तक्रारीवरून पोलिस एकाला चोपतात... ‘माझा भाचा ॲडमिट आहे’, असं सांगत तो एक मोबाइल क्रमांक देतो. पोलिस अंमलदार त्यावर फोन करून ‘कालूचा भाचा, इथं चौकीत ये...’, असा सज्जड दम भरतात. पलीकडून मात्र थेट ‘मी कालूचा भाचा नव्हे, पीएसआय बोलतोय!’ असा आवाज कानी पडतो. त्यावरून एका गर्दुल्ल्यामुळे गुरुवारी (दि. २३) सायंकाळी सिव्हिलच्या चौकीत पोलिस यंत्रणाही चक्रावल्याचा प्रत्यय आला.काय आहे प्रकरण?सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी एका तरुणाला पोलिस चौकीत हजर केले. ‘सर, याने महिला वॉर्डमध्ये व्हिडीओ तयार केलेत,’ अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. चौकीतील पोलिसांनी तरुणाचा मोबाइल ताब्यात घेत व्हिडीओ तपासले. महिला वॉर्डमध्ये जेवण वाढताना झालेल्या गर्दीचा व्हिडीओ असल्याचे दिसल्याने पोलिसांनी तरुणाच्या दोन-तीन कानशिलात लगावल्या. त्याला ‘व्हिडीओ का केला’, असा प्रश्न विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी चांगलाच दणका दिल्यावर ‘माझा भाचा ॲडमिट आहे. त्याला शोधत होतो. सहज व्हिडीओ केला. मी गुन्हेगार नाही. व्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह नाही,’ अशी सराईत उत्तरे त्याने दिली. शिवाय भाच्याचा क्रमांकही पोलिसांना दिला.पोलिसांनी फोन लावत विचारणा केल्यावर त्याने आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या एका उपनिरीक्षकाचा क्रमांक दिल्याचे उघड झाले. त्यावरूनही पोलिसांनी त्याला चांगलेच टोले लगावले. तेव्हा ‘अहो, बॉसनी मला ओळखलं नसेल... मी कालू आहे’, असेच त्याचे दावे सुरू राहिले. पोलिसांनी त्याला चांगलाच चोप देत व्हिडीओ डिलीट करून समज देत हाकलून दिले. अर्धा तास सुरू राहिलेल्या गोंधळामुळे पोलिसांसह सिव्हिलचे सुरक्षारक्षकही त्रासल्याचे दिसले. दुसऱ्यांदा ‘पोलिसवारी’तरुणाने पोलिसांना ‘कालू (रा. भारतनगर)’ असे नाव सांगितले. दुपारीच एका दारू दुकानाबाहेर धिंगाणा घातल्याने मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही बतावणी केली. विशेष म्हणजे, अनेक पोलिसांची नावे घेत त्याने ओळखी दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा गर्दुल्ल्या असून, वेळोवेळी पोलिसांनी त्याला चोप दिल्याचे समोर आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/x8AoZUW

No comments:

Post a Comment