Breaking

Saturday, June 1, 2024

Heatstroke: विदर्भासह नागपुरात उष्णतेच्या लाटेच्या तीव्र झळा; उष्माघाताने नऊ जणांचा मृत्यू https://ift.tt/RWKadUO

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा त्रास होऊन विदर्भात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील सहा, भंडारा जिल्ह्यातील दोन, तर गोंदिया जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान, नागपुरात शनिवारी ४५.४, तर वर्ध्यात ४६.० अंश सेल्सिअस तापमान होते.नागपुरातील मेकोसाबाग पुलाखाली शुक्रवारी दुपारी १च्या सुमारास ४० वर्षीय अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळली. पोलिसांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत खोब्रागडे चौकात ४० वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोमिनपुरा परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानकाजवळील पदपथावर ३५ वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला. घोटाळ-पांजरी मार्गावर शनिवारी सकाळी १०.२५च्या सुमारास ४५ वर्षीय इसमाचा, तर नारी मेट्रो स्थानक परिसरात ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. या सर्वांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात शेतात काम करीत असताना भास्कर पंढरी भुते (४०) यांची प्रकृती बिघडली. लाखांदूर येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना भंडारा येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, भंडाऱ्याला जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत धारगाव येथील अंदाजे ७० वर्षीय गतिमंद महिलेचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील सुरेश उरकुडा गेडाम (४५) यांचाही उष्माघाताने मृत्यू झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lZKu892

No comments:

Post a Comment