Breaking

Friday, June 7, 2024

मस्करी महागात पडली, कम्प्रेसरच्या सहाय्याने मुलाच्या गुदद्वारात हवा भरली, १४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत https://ift.tt/DhtM83d

धुळे: टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणे दोघांना चांगलेच महाग पडले आहे. दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना लळींग शिवारातील पंचरच्या दुकानात ही घटना घडली. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम यांचे टायर पंचरचे दुकान आहे. या दुकानात त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईक मुलगा मोहम्मद खालीक मोहम्मद गनीब (१४) हा देखील काम करायचा. त्यांच्या दुकानाशेजारीच गॅरेज असून त्या ठिकाणी रोहित राजू चंद्रवंशी आणि शिवाजी लक्ष्मण सुळे हे दोघे काम करतात. शेजारीच दुकान असल्याने खालीक हा त्यांना चांगला ओळखत होता. सकाळी नेहमीप्रमाणे दोघांचे दुकान उघडे होते. मात्र मोहम्मद मुजाहिद आलम हे सकाळी १० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घरी गेले होते. त्यामुळे खालीक हा दुकानात एकटा होता. यावेळी शिवाजी सुळे आणि रोहित यांनी त्याची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरली. मोहम्मद खालीकच्या पोटात हवा गेल्याने त्याला त्रास होवू लागला. त्यामुळे शिवाजी आणि रोहित या दोघांनीच त्याला उपचारासाठी हिरे रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी खालिक याला आयसीयुमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी आतड्यांना आणि नसांना दुखापत झाल्याने ऑपरेशन करावे लागणार असल्याचे सांगितले. मात्र, ऑपरेशन थिएटरमध्ये नेले असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/98UOXMZ

No comments:

Post a Comment