निलेश पाटील, जळगाव : रशियातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वैद्यकीय शाखेत शिकत होते. जळगाव जिल्ह्यातील तिघांसोबत भयंकर घटना घडली आहे. जळगावातील तीन विद्यार्थी आपल्या इतर काही मित्रांसोबत वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. पाच जण फेरफटका मारत असताना मोठी लाट आली आणि यात लाटेत ते पाच जण वाहून गेले. मात्र पाच जणांपैकी चौघांचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे. मृत्यू झालेले तिघे जळगाव जिल्ह्यातील आहेत.४ जून रोजी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली. तसंच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे. सध्या रशियन फेडरेशनमधील सर्व संबंधित एजन्सी पुढील कार्यवाही करत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर एकाचा मृतदेह हाती लागला आहे, तर तीन मृतदेहांचा शोध रशिया आपत्ती व्यवस्थापनाकडून अद्याप सुरू आहे. नदीला मोठा प्रवाह असल्याने मृतदेह दूरपर्यंत वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) येथील विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे सहअध्यायी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी, शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी ही शोकांतिका अपघाती आणि अनपेक्षित घडल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतल्याचं सांगितलं आहे. आता पुढील कार्यवाही सुरु आहे. पालकांना पूर्ण ते सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1iyuWRl
No comments:
Post a Comment