: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यावेळी आईची सेवा म्हणून अनेक जण सोन चांदी देवी चरणी अर्पण करत असतात. आणि अर्पण केलेल्या याच दागिन्यांचे मूल्यांकन आज पासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. हे मूल्यांकन 2020 सालापासून चे असून यामध्ये देवीच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांचे मूल्यांकन होत आहे. मूल्यांकनाचे काम दहा ते पंधरा दिवस चालणार असल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री करवीर निवासिनी मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. हीच संख्या सुट्टीच्या दिवसात लाखोंवर जाते आणि ते लाखो फक्त देवीची सेवा म्हणून पैशाच्या रूपात आणि सोने चांदीच्या रूपात भरभरून देवीचरणी अर्पण करत असतात. दरम्यान 2019 साली या सोन्या-चांदीचा मूल्यांकन करण्यात आले होते. यानंतर कोरोना काळात अनेक महिने मंदिर बंद होते यादरम्यान कोणतीही दागिन्यांचे मूल्यमापन करण्यात आले नव्हते. यामुळे 2020 सालापासून च्या दागिन्यांचा मूल्यमापन आज पासून सुरू करण्यात आले आहे. नाशिक येथील सरकार मान्यता प्राप्त वडनेरे अँड सन्स या संस्थेकडून पुढील दहा ते पंधरा दिवस हे मूल्यमापन प्रक्रिया चालणार असून दागिना अर्पण केलेल्या वर्षीचा 31 मार्च रोजी जो काही सोन्या चांदीचा दर होता त्यावरून त्या दागिन्याचे मूल्य ठरवण्यात येणार आहे. परिसरातील देवस्थान समितीच्या कार्यालयात हे मूल्यमापन सुरू असून यासाठी नितीन वडनेरे, सचिन वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल आगरकर, एकनाथ पारखी, योगेश पिंपळगावकर याच्या सह 7 जणांची टीम हे मूल्यमापन करत आहेत. यावेळी मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सहसचिव शितल इंगवले, खजिनदार महेश खांडेकर हे देखील उपस्थित असून देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांमध्ये मनी, मंगळसूत्र ,अंगठी ,सोन्याची नाणी ,कानातले हार ,नाकातील नथ, नेकलेस, बोरमाळ , किरीट या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. तर पैंजण, जोडवी, पाळणे ,डोळे, फुलं, अंगठी ,देवीची मूर्ती, नामी, छत्र, चांदीचा किरीट आणि देवीची प्रतिमा असे चांदीचे दागिने देवीला अर्पण करण्यात आले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/btT0KAp
No comments:
Post a Comment