मुंबई : पावसाळ्यात नेरळ ते माथेरानदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने आज, शनिवारपासून नेरळ ते अमन लॉज मिनीट्रेन सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या सुरू राहणार आहेत.अमन लॉज ते माथेरानदरम्यान सोमवार ते शुक्रवारदरम्यान रोज ६ शटल फेऱ्या धावतात. शनिवारी-रविवारी प्रवाशांच्या संख्या अधिक असल्याने २ वाढीव फेऱ्यांसह एकूण आठ फेऱ्या चालवण्यात येतात. ३ द्वितीय श्रेणीचे डबे, एक प्रथम श्रेणी डबा आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन अशा एकूण सहा डब्यांची मिनी ट्रेन पावसाळ्यात धावती राहणार आहे. ८ जून ते १५ ऑक्टोबरदरम्यान नेरळ ते अमन लॉजदरम्यान मिनीट्रेन फेऱ्या बंद राहणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.नेरळ ते माथेरान मिनीट्रेन मार्ग डोंगरातून जातो. मुसळधार पावसात हा मार्ग धोकादायक ठरतो. प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून नेरळ ते अमन लॉज रेल्वेमार्ग दरवर्षी बंद करण्यात येतो. पावसाळ्यात माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठी असल्याने पर्यटकांच्या सुविधेसाठी अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. माथेरान ते अमन लॉजदरम्यान शटल फेऱ्यासकाळी ८.२०, सकाळी ९.१०, सकाळी ११.३५, दुपारी २.००, दुपारी ३.१५, संध्याकाळ ५.२०शनिवार-रविवारी (वाढीव फेऱ्या)सकाळी १०.०५ आणि दुपारी १.१०माथेरान ते अमन लॉजदरम्यान शटल फेऱ्यासकाळी ८.४५, सकाळी ९.३५, दुपारी १२.००, दुपारी २.२५, दुपारी ३.४०, सायंकाळी ५.४५शनिवार-रविवारी (वाढीव फेऱ्या)सकाळी १०.३० आणि दुपारी १.३५
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YlRrJQE
No comments:
Post a Comment