Breaking

Monday, June 3, 2024

पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा लाजीरवाणा पराभव, दक्षिण आफ्रिकेने धुळ चारली https://ift.tt/zHe6jUd

न्यूयॉर्क : टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा या सामन्यात ७७ धावांत खुर्दा उडवला. श्रीलंकेची आतापर्यंतची ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. आतापर्यंत या वर्ल्ड कपमध्ये एकढी कमी धावसंख्या करण्याची नामुष्की ओमान आणि नामिबियासारख्या संघावरही ओढवली नव्हती. त्याचबरोबर श्रीलंकेची ही टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी श्रीलंका भारतापुढे २०१६ साली ८२ धावांवर ऑल आऊट झाली होती. श्रीलंकेच्या फलंदाजांनी यावेळी दक्षिण आफ्रिकेपुढे लोटांगण घातले आणि त्यामुळे त्यांचा मानहानीकारक पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ७८ धावांचे आव्हान लीलया पेलले आणि सहा विकेट्स राखून विजय मिळवला.श्रीलंकेच्या संघाला सुरुवातीपासूनच एकामागून एक धक्के बसत गेले आणि त्यामुळेच त्यां मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर कामिंडू मेंडिस ११ धावांवर बाद झाला केशव महाराजने तर त्यानंतर एकाच षटकात श्रीलंकेच्या संघाला दोन धक्के दिले. केशवने प्रथम श्रीलंकेचा कर्णधार वानिंडू हसरंगाला बाद केले, त्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतरच्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला शून्यावर बाद केले. यावेळी केशव हॅट्रीकवर होता. पण यावेळी त्याला हॅट्रीक मात्र साधता आली नाही. पण त्याने श्रीलंकेचे कंबरडे मात्र मोडले.अँजेलो मॅथ्यूज हा सर्वात अनुभवी खेळाडू त्यावेळी मैदानात होता. मॅथ्यूजने दोन षटकार लगावत सामन्यात थोडीशी रंजकता आणली खरी, पण तो १७ धावांवर बाद झाला आणि काही वेळातच श्रीलंकेचा डाव ७७ धावांत आटोपला. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सर्वात चांगले यश मिळवून दिले ते एनरिच नॉर्त्झे या वेगवान गोलंदाजाने. कारण एनरीचने यावेळी चार षटकांत फक्त सात धावा देत चार बळी मिळवण्याची किमया साकारली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने गोलंदाजीच्या जोरावरच हा सामना ९९ टक्के जिंकला होता.श्रीलंकेच्या माफक ७८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने संयतपणे खेळत हे आव्हान सहजपणे पेलले. पण हे आव्हान पेलण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला दोन विकेट्लही लवकर गमवाव्या लागल्या. दुसऱ्या षटकात नुवान तुषाराने रीझा हेंड्रीक्सला चार धावांवर बाद केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमला दासुन शनाकाने १२ धावांवर बाद केले. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दमदार खेळत करत विजय साकारला. हेन्रीच क्लासिनने दमदार फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात तरी ते विजय मिळवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cMgk8Eq

No comments:

Post a Comment