Breaking

Thursday, July 4, 2024

रोहित आणि विराटने वानखेडे गाजवलं, ढोल-ताश्यांच्या गजरात कसा धरला ठेका पाहा खास व्हिडिओ... https://ift.tt/6UfdnhT

मुंबई : वानखेडे स्टेडियम रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी चक्क डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळालं. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ढोल-ताश्यांच्या गजारात जबरदस्त ठेका धरला आणि या दोघांनी वानखेडे स्टेडियम गाजवले. या दोघांचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताच्या विक्टरी परेडमध्ये तसे शांत होते. सुरुवातीला हा वर्ल्ड कप आपल्या हातात धरून होता. भारताचा संग जेव्हा मुंबईत दाखल झाला तेव्हापासून हार्दिकने वर्ल्ड तप जो पकडला तो विक्टरी परेडमध्येही आपल्या हातात कायम ठेवला होता. पण थोड्या वेळाने भारताच्या खेळाडूंनी त्याच्याकडून वर्ल्ड कप आपल्या हातात घेतला आणि जोरदार सेलिब्रेशन केले. विक्टरी परेडच्या अखेरच्या क्षणांमध्ये विराट कोहलीने वर्ल्ड कप हातात घेतल्याचे पाहायला मिळाले. या सर्व गोष्टी रोहित शर्मा बसच्या मागे बसून पाहत होता. पण त्यानंतर त्याला बसच्या पुढच्या भागात बोलावले ते विराट कोहलीने.विराटने रोहितला बसच्या पुढच्या भागात बोलावले. त्यानंतर विराटने आपल्या हातातला वर्ल्ड कप रोहितच्या हातात दिला आणि त्या दोघांनी सुंदर पोझ दिली. त्यानंतर भारताचा संघ हा वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाला. त्यानंतर रोहित शर्माची एक खास मुलाखत झाली. बीसीसीआयने त्यानंतर भारतीय संघाला जाहीर केलेले १२५ कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात आले. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मैदानात भन्नाट डान्स करायला सुरुवात केली. मैदानात ढोल ताश्यांचा जोरदार गजर सुरु होता आणि त्यावर रोहित आणि विराट यांनी चांगलाच ठेका धरला. विराट आणि रोहित यांना भारतीय खेळाडू चांगलेच थिरकल्याचे पाहायला मिळाले. भारतीय खेळाडूंनी यावेळी चांगलाच डान्स केला आणि चाहत्यांची मनं जिंकली. वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय खेळाडूंनी विजयी फेरीही मारली. त्यावेळी चाहत्यांनी भारतीय संघाचे जोरदार स्वागत केले. भारतीय खेळाडूंनीही यावेळी चाहत्यांकडून मानवंदना स्विकारली. त्यामुळे वानखेडेच्या मैदानात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/V46Ad58

No comments:

Post a Comment